शेअर करा
 
Comments
Our region is blessed to have given to the world the invaluable gift of Buddha and his teachings: PM Modi
Buddhism and its various strandsare deep seated in our governance, cultureand philosophy: PM
The divine fragrance of Buddhism spread from India to all corners of the globe: PM Modi
Buddhism imparts an ever present radiance to India-Sri Lanka relationship, says PM Modi
India’s rapid growthcan bring dividends for the entire region, especially in Sri Lanka: PM
India is committed to the economic prosperity of our Sri Lankan brothers and sisters: PM Modi

सर्वात आदरणीय, श्रीलंकेचे महानायकोंथेरो,

सर्वात आदरणीय, श्रीलंकेचे संघराजथायरोज,

सन्माननीय धार्मिक आणि आध्यात्मिक नेते,

आदरणीय राष्‍ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना, आदरणीय पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, आदरणीय सभापती कारू जयसूर्या, आंतरराष्ट्रीय वेसाक दिन मंडळाचे अध्यक्ष आदरणीय ब्राह्रमण पंडित, शिष्ठमंडळाचे माननीय सदस्य,

प्रसार माध्यमातील स्नेही,

महिला आणि सज्जनहो,

नमस्कार. अयुबुवन.

वेसाक हा सर्वात पवित्र दिवस आहे.

या दिवशी “तथागत” बुध्दाला ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतरच्या महान आदरणीय बुध्दाचा एकप्रकारे नवा जन्म झाला, असे म्हणावे लागेल. या दिनाचे महत्व म्हणजे जीवनाचे एक महान, कालातीत सत्य उमगण्याचा दिवस आजचा आहे. “धम्म”चा विचार केला तर चार उदात्त सत्याचा आजच्या दिवसाशी खूप गहिरा संबंध आहे.

आज बुध्दाने सांगितलेल्या दहा महत्वपूर्ण गोष्टींवर सखोल चिंतन करण्याची आवश्यकता आहे. दान, उदारता, योग्य आचार, निवृत्ती अर्थात सर्वसंगपरित्याग, ज्ञान, ऊर्जा म्हणजेच शक्ती, सहिष्णुता, सत्यता, निर्धार म्हणजेच निश्चय, कृपा आणि मनाची शांती. या त्या दहा गोष्टी आहेत.

आजचा दिवस तुम्हा श्रीलंकावासियांप्रमाणेच आम्हा भारतीयांच्या दृष्टीने आणि अवघ्या विश्वामध्ये असणाऱ्या बुध्दांच्या अनुयायांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय वेसाक दिनी कोलंबो इथं होत असलेल्या प्रमुख कार्यक्रमामध्ये मला प्रमुख अतिथीचा सन्मान दिल्याबद्दल मी, आदरणीय राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना, आदरणीय पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, आणि श्रीलंकेच्या जनतेचा आभारी आहे. आजच्या अतिशय पवित्र, मंगलदिनी माझ्याबरोबर सम्यकसंबुध्दाच्या भूमीतील सव्वाशे कोटी लोकांच्या शुभेच्छा मी घेवून आलो आहे.

सन्माननीय मंडळी आणि मित्रांनो,

आपल्या खंडाला बुध्दाची आणि त्याच्या शिकवणुकीची अमूल्य भेट लाभली आहे. हे आपल्या खंडाला मिळालेले वरदानच म्हणता येईल. ज्याठिकाणी राजा सिद्धार्थ बुद्ध बनला ते स्थान ‘बोधगया’ भारतात आहे. बोधगया तर बौद्धांच्या विश्वाचा जणू गाभा, अगदी महत्वपूर्ण केंद्रस्थान आहे. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बु्द्धाने पहिले प्रवचन वाराणसीमध्ये दिले. याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी संसदेमध्ये करतोय. धम्मचक्राचा प्रस्ताव मीच त्यामुळे संसदेमध्ये मांडला. आमचे राष्ट्रीय प्रतीक बौद्ध विचारांपासून प्रेरणा घेवून बनवण्यात आले आहे. एकूण बौद्ध परंपरा आणि तत्वज्ञान आमच्या प्रशासनामध्ये, सांस्कृतीमध्ये खोलवर रूजले आहे. बौद्ध तत्वज्ञानाचा दैवी परिमळ भारतामधूनच संपूर्ण विश्वाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. महिंद्रा आणि संघमित्रा या राजा अशोकाच्या महान मुलांचा भारत ते श्रीलंका हा प्रवास “धम्मदूत” म्हणूनच तर झाला. या प्रवासाची अमूल्य भेट म्हणजे ‘धम्म’ आहे.

याविषयी स्वत: बुद्धांनी म्हटले आहे, धम्म म्हणजे सगळ्यांना मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. आज श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माची शिकवण चांगल्या प्रकारे दिली जात आहे, बौद्धधर्माचे महत्वपूर्ण अध्यापन केंद्र श्रीलंका बनली आहे. ही खरोखरीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

अनेक शतकांनंतर अनागारिका धर्मपाला यांनी अगदी अशाच प्रकारे परिक्रमा केली. मात्र यावेळी बौद्ध शक्तीला मूळ भूमीमध्ये पुनरूज्जीवित करण्यासाठी ते श्रीलंकेहून भारतामध्ये आले. अगदी त्याचप्रमाणे आपण आम्हाला स्वतःच्या मुळापर्यंत परत आणण्याचे कार्य केले आहे. अतिशय महत्वपूर्ण अशा बौद्ध वारशाचे घटक काळजीपूर्वक जतन आणि संवर्धन केल्याबद्दल अवघे विश्व श्रीलंकेचे ऋणी राहणार आहे. वेसाकमुळे बौद्ध धर्माचा वारसा जतन करण्याची संधी मिळत आहे. आपल्या समाजाला शतकानुशतके आणि अनेक पिढ्यांना जोडणारा हा वारसा आहे.

मित्रांनो,

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मैत्रीचे दृढ संबंध निहित वेळेत निर्माण व्हावेत, अशी त्या महान परमात्म्याची इच्छा होती. बौद्ध धर्मामुळे आपल्या नात्याला एक वेगळेच परिमाण लाभले आहे, त्याची एक झळाळी आहे. निकटवर्ती शेजारी राष्ट्रे म्हणून या नातेसंबंधामध्ये अनेक स्तर आहेत. बौद्ध धर्माची अशी काही मूल्ये आहेत, त्यामधील अमर्याद शक्यतांमुळे आपल्याला भविष्यातही अगणित ऊर्जा मिळणार आहे. आपल्यातील ही मैत्री उभय देशांतील जनतेच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आहे. मैत्रीचे धागे आपल्या समाजाच्या बांधणीमध्येही विणले गेले आहेत.

बौद्ध वारशाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी येत्या ऑगस्टपासून एअर इंडियाच्या वतीने कोलंबो आणि वाराणसी दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे. या हवाई सेवेमुळे श्रीलंकेतील माझ्या बंधू आणि भगिनींना बुद्धाच्या भूमीला थेट भेट देणे सोईचे जाणार आहे. श्रावस्ती, कुशीनगर, संकसा, कौशंबी आणि सारनाथ येथेही सहजपणे प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर माझ्या तामिळ बंधू आणि भगिनींना वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणे सुकर होणार आहे.

आदरणीय संत, महंत आणि मित्रांनो,

श्रीलंकेशी नातेसंबंध दृढ करताना यामध्ये खूप मोठ्या संधी निर्माण होतील असा मला विश्वास आहे. वेगवेगळया क्षेत्रांमध्ये आपल्या सहभागीतेमुळे मोठी भरारी घेण्याची संधी निर्माण होणार आहेत. आणि आपण केलेली प्रगती, मिळवलेले यश हेच आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे सर्वथा योग्य मापदंड ठरणार आहेत. श्रीलंकेमधील आमच्या बंधू आणि भगिनींची आर्थिक वृद्धी व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्यातील विकासात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आम्ही सातत्याने गुंतवणूक करणार आहोत. ज्ञान, क्षमता आणि समृद्धी यांचे आदान-प्रदान केल्यामुळे आपले सामर्थ्‍य अधिक वाढणार आहे. व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये आपण आधीपासूनच महत्वपूर्ण भागिदार आहोतच.

आपल्‍या सीमांदरम्यान होणारी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि संकल्पनांची मुक्त देवाण घेवाण उभय पक्षांसाठी लाभदायक ठरणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. भारताचा वेगाने होणारा विकास संपूर्ण क्षेत्रासाठी, विशेषत: श्रीलंकेसाठीही लाभाचा ठरणार आहे. पायाभूत सुविधा आणि संपर्क, वाहतूक आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.शेती, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, वाहतूक, वीज, संस्कृती, पाणी, निवारा, क्रीडा आणि मनुष्यबळ अशा मानवी आयुष्याशी निगडीत जवळपास प्रत्येक क्षेत्रात आपण विकास करण्‍यासाठी भागीदारी केली आहे.

आज भारताचे श्रीलंकेशी असणारे विकास सहकार्य 2.6 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचले आहे. श्रीलंकेला आपल्या जनतेला शांततापूर्ण, समृद्ध आणि सुरक्षित भविष्य प्रदान करता यावे, असा या सहकार्यामागे आमचा उद्देश आहे. कारण श्रीलंकेतील नागरिकांचे आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य हे सव्‍वाशे कोटी भारतीयांशी जोडले गेले आहे.सुरक्षा, मग ती जमिनीवर असो किंवा हिंदी महासागरातील असो, आपल्‍या समाजाची सुरक्षा ही अविभाज्य बाब आहे. राष्ट्रपती सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्याशी मी साधलेल्‍या संवादामध्‍ये दोन्‍ही देशांचे संयुक्‍त उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हातमिळवणी करण्याच्या आमच्या इच्छेची पुनरावृत्ती झाली. जेव्हा तुम्हाला सुसंवाद साधण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाचा पर्याय निवडण्‍याची वेळ तुम्हाला पडेल त्‍यावेळी राष्ट्र-उभारणीसाठी सहाय्य करणारा मित्र आणि भागीदार भारताच्या रूपात सापडेल.

सन्‍माननीय महंत, आदरणीय आणि मित्रांनो,

आजच्‍या एकविसाव्या शतकामध्येही भगवान गौतम बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी दिलेला संदेश सुसंगत ठरत आहे, लागू होत आहे. बुद्धाने दाखवलेला ‘मध्यम मार्ग’ आपणा सर्वांशीच संवाद साधतो. हा संदेश विश्वव्यापी आणि कालातीत स्वरूपात असल्‍यामुळे निश्चितच आजही तितकाच मार्गदर्शक ठरणारा आहे. बुद्ध एक सर्व राष्ट्रांना एकत्र आणणारी शक्ती आहे. दक्षिण, मध्य, आग्नेय आणि पूर्व आशियातील देशांनाही बुद्धाच्या भूमीशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधाचा सार्थ अभिमान आहे.

वेसाक दिन साजरा करण्यासाठी निवडलेली सामाजिक न्याय आणि शाश्वत जागतिक शांततेची संकल्पना ही बुद्धाच्या शिकवणीशी सुसंगत अशीच आहे. कदाचित या संकल्पना वेगळ्या वाटू शकतात. परंतु त्यांचा खोलवर विचार केला तर स्वतंत्र तरीही एकमेकांशी जोडलेल्या आहेत, हे लक्षात येते. सामाजिक न्यायाचा मुद्दा हा अंतर्गत आणि समुदायांतर्गत विरोधाभासाशी निगडीत आहे. याचा उगम मूळ संस्कृत भाषेमधल्‍या तन्हा किंवा तृष्णा म्हणजेच तहान अर्थात अतिलोभातून होतो. हव्‍यासामुळे माणसांनी आमच्या नैसर्गिक आश्रयस्‍थानांवर अधिकार मिळवला. येवढेच नाही तर त्याचा विध्वंसही केला. खूप नाही तर सगळे काही मिळवण्याच्या आमच्या लोभी वृत्तीमुळे समाजामध्‍ये विषमता, असमानता निर्माण करणारे उत्पन्नगट तयार झाले आणि त्यामुळे सामाजिक एकोपा, सुसंवाद यांनाच धोका उत्‍पन्‍न झाला.

अगदी याचप्रमाणे आजमितीला शाश्वत वैश्विक शांतता निर्माण होण्‍यासाठी अनेक राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्ष हे सर्वात मोठे आव्हान का ठरले याचा विचार केला पाहिजे. द्वेष आणि हिंसा यांच्या मूळाशी असणारी वृत्ती, विचारप्रवाह, घटक आणि साधने हे या संघर्षामागचे खरे कारण आहे. मूळ प्रवृत्‍ती नष्‍ट करणे हेच आजचे खरे आव्‍हान आहे. आपल्‍या प्रदेशातील दहशतवादाचा धोका हे या विध्वंसक भावनांचे प्रकटीकरण आहे. अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे तिरस्काराची बीजे रूजविणारी ही विचारसरणी आणि त्यांचे प्रचारक यांनी संवादासाठी खुलेपणा कधीच दाखवला नाही. त्यामुळे केवळ मृत्यू आणि विनाश ओढवतो आहे. विश्‍वभरामध्‍ये वाढत असलेल्‍या हिंसेला बुद्धाने दिलेल्‍या शांततेच्या संदेशामुळेच उत्तर मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे.

आणि, संघर्ष नाही म्हणजे शांतता आहे; असे अजिबात म्‍हणता येणार नाही, हे सुद्धा खरे आहे. परंतु सकारात्‍मक शांतता असेल तर सुसंवादाला प्रोत्‍साहन मिळते. करुणा (अनुकंपा) आणि प्रज्ञेवर (ज्ञान) आधारित संवाद, सुसंवाद आणि न्यायाला प्रोत्साहन देण्यासाठी सगळे प्रयत्नशील असतात, तेथेच खरी शांतता नांदते. बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे, ,"नत्तीसंतिपरणसुखं’’ म्‍हणजेच “शांतीपेक्षा अधिक मोठा आनंद नाही”. वेसाक निमित्त भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश आपल्या सरकारी धोरणात आणि वर्तनात शांतता, स्वीकार, समावेशकता आणि करूणा या मूल्यांना प्रोत्साहन देतील आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांचे पालन करीत संयुक्‍तपणे काम करतील, अशी आशा मला वाटते. लोभ, तिरस्कार-व्‍देष आणि अज्ञान या तीन विषाक्त गुणांपासून व्यक्ती, कुटुंबे, समाज, राष्ट्रे आणि जगाला मुक्त करण्यासाठी हाच खरा मार्ग आहे.

आदरणीय संत, सन्‍माननीय आणि मित्रहो,

वेसाकच्या पवित्र दिवशी ज्ञानाचे दीप लावून या तमातून- अंधारातून बाहेर पडण्यासाठी आपण, सखोल आत्मपरीक्षण करूया त्‍याचबरोबर केवळ सत्याची कास धरूया. आणि ज्यांच्या प्रकाशाने अवघे विश्व प्रकाशित होत आहे अशा बुद्धाच्या मार्गांचे अनुसरण करण्यासाठी आपले प्रयत्न समर्पित करूया.

धम्मपदाच्या 387 व्या श्लोकात नमूद केले आहे की,

दिवातपतिआदिच्चो,रत्तिंगओभातिचंदिमा.

सन्न्द्धोखत्तियोतपति,झायीतपति ब्राह्मणों.

अथसब्बमअहोरत्तिंग,बुद्धोतपतितेजसा.

याचा अर्थ असा की,

सूर्यामुळे दिवसा प्रकाश मिळतो,

चंद्रामुळे रात्र प्रकाशमान होते,

चिलखतामुळे योद्धा तळपतो.

उपासनेमुळे ब्राह्मणाला तेज येते,

परंतु ज्या व्‍यक्‍तीचा आत्मा जागृत झाला, तो स्वत:च्याच तेजाने सदोदित, दिवस-रात्र तळपत असतो.

या समारंभात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मी आज दुपारी कॅंडी येथे श्रीदाल्दा मालिगावा पवित्र दोंगा अवशेष मंदिरात आदरांजली वाहण्यास उत्सुक आहे. बुद्ध, धम्म आणि संघ हे तीन रत्नं आहेत आणि त्‍यांचे वरदान आपणा सर्वांना अखंड लाभावे , अशी सदिच्छा व्यक्‍त करतो.

धन्‍यवाद, खूप खूप धन्‍यवाद .

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Nearly 400.70 lakh tons of foodgrain released till 14th July, 2021 under PMGKAY, says Centre

Media Coverage

Nearly 400.70 lakh tons of foodgrain released till 14th July, 2021 under PMGKAY, says Centre
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Contribute your inputs for PM Modi's Independence Day address
July 30, 2021
शेअर करा
 
Comments

As India readies to mark 75th Independence Day on August 15th, 2021, here is an opportunity for you to contribute towards nation building by sharing your valuable ideas and suggestions for PM Modi's address.

Share your inputs in the comments section below. The Prime Minister may mention some of them in his address.

You may share your suggestions on the specially created MyGov forum as well. Visit