गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की, “आमचे प्रिय आणि आदरणीय केशुभाई यांचे निधन झाले, याचा मला फारच धक्का बसला आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करणारे ते एक प्रख्यात राजकीय नेता होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुजरातच्या विकासासाठी आणि प्रत्येक गुजरातीच्या सक्षमीकरणासाठी वाहिले.

जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाला बळकट करण्यासाठी केशुभाईंनी संपूर्ण गुजरातचा प्रवास केला आणि आणीबाणीला कडाडून विरोध केला. ते शेतकर्‍यांशी संबंधित प्रश्नांबाबत नेहमीच संवेदनशील असत, मग ते आमदार, खासदार, मंत्री असोत की मुख्यमंत्री असोत, त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणीही केली.

केशुभाई माझ्यासह इतर तरूण कार्यकर्त्यांसाठी विश्वासू मार्गदर्शक ठरले. प्रत्येकाला त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडत असे. त्याचा मृत्यूने एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही आणि आज त्यांच्या निधनाने आपण सर्वजण दु: खी आहोत. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांच्या दुःखात सहभागी आहे. मी त्यांचा मुलगा भरत यांच्याशी बोलून माझ्या भावना व्यक्त केल्या. ओम शांती. "

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-EU trade pact to better tech access

Media Coverage

India-EU trade pact to better tech access
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Nagaland meets Prime Minister
March 24, 2026