चौथ्या भारत-जर्मनी आंतरसरकारी सल्लामसलतींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बर्लिनमध्ये दाखल झाले. पंतप्रधानांची ही जर्मनीला दिलेली दुसरी द्विपक्षीय भेट आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्कल यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी बर्लिनजवळ शॉटस् मेझेनबर्ग येथे अनौपचारिक भोजनाचे आयोजन केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये स्मार्ट सिटीज, कौशल्य विकास, स्वच्छ ऊर्जा तसंच इतर समान मुद्यांबाबत सुमारे 3 तास चर्चा झाली. वस्तू सेवा करासह भारताच्या आर्थिक विकास कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांचा आढावा घेतला. युरोपियन युनियनची संलग्नता आणि जागतिक स्थैर्यासाठी असलेले त्याचे महत्त्व याचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. अफगाणिस्तानबाबत चर्चा करताना अफगाण नेतृत्वाखालील अफगाणिस्तानातील सलोख्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.

मूलतत्त्ववादी विचारांचे निर्मूलन, दहशतवाद तसंच चीनच्या बेल्ट ॲण्ड रोड धोरण, हवामान बदल या संदर्भातही यावेळी चर्चा झाली.  

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Government's foodgrain stocks hit 604 lakh tonnes, nearly three times buffer requirement

Media Coverage

Government's foodgrain stocks hit 604 lakh tonnes, nearly three times buffer requirement
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 मे 2026
May 07, 2026

Justice Delivered Under PM Modi: How Operation Sindoor Redefined India’s Response to Terror

Aatmanirbhar Bharat in Action: Record Exports, Defence Exports, Food Security & Green Mobility Under the Leadership of PM Modi