पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  फ्रेन्च गणराज्याचे अध्यक्ष  म. म. इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी  दूरध्वनीवरून संभाषण केले.

युक्रेनमधील सद्यःपरिस्थितीवर या दोन नेत्यांनी चर्चा केली. युक्रेनमधील हिंसाचार व  बिघडत चाललेली मानवतावादाची परिस्थिती यावर त्यांनी आपापली मते प्रदर्शित केली.

हिंसाचार थांबवणे आणि राजकीय पद्धतीने व चर्चेद्वारे या समस्येवर उपाय शोधण्याच्या आपल्या आवाहनाचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. सध्याच्या आधुनिक जगात आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव, सर्व देशांची  प्रादेशिक एकात्मता व सार्वभौमत्व या सर्व तत्वांवर  भारताचा संपूर्ण विश्वास असल्याचे यावेळी मोदी यांनी नमूद केले.

या द्विपक्षीय चर्चेचे मोदी यांनी स्वागत केले. सर्व नागरिकांचा विनाअडथळा प्रवास आणि मुक्त व मानवतावादी संचार सुनिश्चित करणे, यावर त्यांनी भर दिला.

अशांत भागांमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या, तसेच जखमींसाठी तातडीचा  वैद्यकीय पुरवठा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची  माहिती मोदी यांनी अध्यक्ष मॅक्रोन यांना दिली.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Best Never The Loudest': Bear Grylls Gives Shoutout To ‘Powerful Leader’ PM Modi

Media Coverage

'Best Never The Loudest': Bear Grylls Gives Shoutout To ‘Powerful Leader’ PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 जुलै 2026
July 15, 2026

Rooted in Tradition, Built for Tomorrow: PM Modi’s Blueprint for a Developed India