वस्तू आणि सेवा कर यशस्वीरित्या लागू केल्याबद्दल षण्मुगरत्नम यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. द्विपक्षीय संबंध, विशेषतः आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय संबंधातल्या प्रगतीबद्दल त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. गुंतवणूक,नागरी विकास,कौशल्य विकास,हवाई वाहतूक यासारख्या क्षेत्रात घनिष्ठ द्विपक्षीय सहकार्याची, पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
बँकिंग,पर्यटन,नाविन्यता,डिजिटल फायनान्स या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला असलेला वाव, याबाबतही उभय नेत्यांनी चर्चा केली.


