पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामिबिया दौऱ्यादरम्यान झालेले महत्त्वाचे करार आणि घोषणा खाली नमूद केल्या आहेत:
सामंजस्य करार (MOUs) / करार:
नामिबियामध्ये उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्याबाबतचा सामंजस्य करार
आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्य करण्याबाबतचा सामंजस्य करार
महत्त्वाच्या घोषणा:
नामिबियाने आपत्कालीन परिस्थितीत टिकाव धरू शकणार्या - शाश्वत पायाभूत सुविधांविषयक आघाडीत सामील होण्याबद्दलचे स्वीकृती पत्र सादर केले.
नामिबियाने जागतिक जैवइंधन आघाडीत (Global Biofuels Alliance) सामील होण्याबद्दलचे स्वीकृती पत्र सादर केले.
नामिबिया हा यूपीआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी परवाना कराराचा स्वीकार करणारा जागतिक स्तरावरचा पहिला देश ठरला आहे.


