अनुक्रमांक

शीर्षक

संक्षिप्त वर्णन

1

भारताचे संरक्षण मंत्रालय आणि न्यूझीलंड संरक्षण दल यांच्यात सागरी सहकार्यावरील व्यवस्थापन सामंजस्य करार

या अंतर्गत संवाद, समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून हिंद-प्रशांत क्षेत्रात वाढीव सागरी सहकार्यासाठी एका चौकटीची स्थापना करण्यात येईल.

2

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान जलमापनशास्त्र (Hydrography) आणि सागरी नकाशाशास्त्र (Nautical Cartography) सहकार्याविषयक अंमलबजावणी व्यवस्था

याच्या माध्यमातून नौकानयन तक्ते संयुक्तपणे तयार करणे, जलमापन डेटाची देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी याद्वारे जलमापनशास्त्रातील सहकार्य अधिक बळकट केले जाईल.

3

भारतीय नौदल आणि न्यूझीलंड संरक्षण दल यांच्यात परस्पर लॉजिस्टिक साहाय्य पुरवण्याबाबतची व्यवस्था

या अंतर्गत मान्यताप्राप्त उपक्रम आणि मोहिमांदरम्यान भारतीय नौदल आणि न्यूझीलंड संरक्षण दल यांच्यात परस्परांना लॉजिस्टिक साहाय्य देणे सुलभ होईल.

4

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कृती गट स्थापन करण्याबाबतची व्यवस्था

या अंतर्गत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य बळकट करणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक 'दहशतवादविरोधी संयुक्त कृती गट' स्थापित केला जाईल.

5

भारताचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि न्यूझीलंडची राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था (NEMA) यांच्यातील सहकार्य विषयक सामंजस्य करार

या अंतर्गत भूकंप प्रतिरोधक क्षमता, त्सुनामी सज्जता, किनारपट्टीवरील धोके कमी करणे, ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण, धोरणात्मक संवाद आणि क्षमता बांधणी यावर प्रामुख्याने भर देऊन आपत्ती जोखीम व्यवस्थापनातील सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल.

6

भारताचे मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि न्यूझीलंडचे प्राथमिक उद्योग मंत्रालय यांच्यात पशुपालन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार

या अंतर्गत तांत्रिक सहकार्य, ज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून पशुपालन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात वाढीव सहकार्यासाठी एक चौकट तयार केली जाईल.

7

भारताचे पर्यटन मंत्रालय आणि न्यूझीलंडचे व्यवसाय, नवोपक्रम आणि रोजगार मंत्रालय यांच्यात पर्यटन क्षेत्रातील व्यवस्थापन विषयक सामंजस्य करार

या अंतर्गत आर्थिक संबंध बळकट करणे, पर्यटकांचा ओघ वाढवणे आणि दोन्ही देशांच्या संस्कृतीबद्दल परस्परांमध्ये आकलन वाढवणे या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल.

8

क्रीडा क्षेत्रातील भारत-न्यूझीलंड संयुक्त कृती आराखडा

या अंतर्गत उच्च-क्षमता क्रीडा, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र आणि खेळाडूंचा विकास यांसह क्रीडा क्षेत्रातील सहकार्यासाठी एक चौकट प्रदान केली जाईल.

9

गुजरात येथील लोथल येथे 'राष्ट्रीय सागरी वारसा संकुल' (NMHC) विकसित करण्यासाठी NMHC आणि न्यूझीलंड सागरी संग्रहालय यांच्यात व्यवस्थापनविषयक सामंजस्य करार

या अंतर्गत परस्पर सहकार्य आणि दोन्ही बाजूंनी मान्य केलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून लोथल येथील 'राष्ट्रीय सागरी वारसा संकुल' (NMHC) विकसित करण्यासाठी सहकार्याची एक चौकट निर्माण केली जाईल.

10

भारताचे संस्कृती मंत्रालय आणि न्यूझीलंडचे संस्कृती आणि वारसा मंत्रालय यांच्यातील सांस्कृतिक सहकार्याबाबतची व्यवस्था

या अंतर्गत परस्पर सामंजस्य आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंध बळकट करण्यासाठी कला, वारसा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या देवाणघेवाणीद्वारे सांस्कृतिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल

 

घोषणा:

अनुक्रमांक

शीर्षक

संक्षिप्त वर्णन

1

भारत-न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी आणि 2030 चा कृती आराखडा

भारत आणि न्यूझीलंड यांनी आपले संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेले आहेत. यामुळे व्यापार, संरक्षण, सागरी सुरक्षा, पर्यटन, संस्कृती, क्रीडा, कृषी-तंत्रज्ञान, परस्पर संबंध, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील प्राधान्यक्रम आणि बहुपक्षीय मुद्द्यांवरील समन्वयाला अधिक बळकटी मिळेल. 'रोडमॅप टू 2030' (कृती आराखडा) पुढील चार वर्षांसाठी संबंधित मंत्रालये आणि भागधारकांमध्ये या धोरणात्मक भागीदारीची पद्धतशीर अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करतो.

2

2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून NZ$7 अब्ज किंवा ₹35,000 कोटींवर नेणे

मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी आर्थिक संबंधांना गती देण्यासाठी आणि बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी 2030 पर्यंत आपला द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून तो NZ$7 अब्ज (₹35,000 कोटी) वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

3

सागरी सुरक्षा संवादाची (मॅरिटाईम सिक्युरिटी डायलॉग) स्थापना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सहकार्य, समन्वय आणि माहितीची देवाणघेवाण अधिक बळकट करण्यासाठी 'सागरी सुरक्षा संवाद' सुरू करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

4

इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह (IPOI) अंतर्गत न्यूझीलंडकडून 'सागरी सुरक्षा' हे प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित

IPOI च्या सात मुख्य स्तंभांपैकी, न्यूझीलंड 'सागरी सुरक्षा' या क्षेत्रात सामील झाला आहे. याद्वारे बेकायदेशीर, नोंद नसलेली आणि अनियंत्रित (IUU) मासेमारी रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून सहकार्यात्मक उपक्रम राबवले जातील.

5

न्यूझीलंडचा 'ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स' (जागतिक जैवइंधन आघाडी) मध्ये समावेश

न्यूझीलंड या जागतिक जैवइंधन आघाडीत सामील झाल्यामुळे, स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी शाश्वत जैवइंधनाचा विकास आणि वापर वाढवण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना बळ मिळेल.

6

कीवीफ्रूट ॲक्शन प्लॅनचा शुभारंभ आणि नागालँड व उत्तराखंड येथे 2 'सेंटर्स ऑफ एक्सलन्स' (उत्कृष्टता केंद्र) ची स्थापना

मुक्त व्यापार करारांतर्गत असलेल्या कृषी उत्पादकता भागीदारीचा एक भाग म्हणून, कीवीफ्रूट ॲक्शन प्लॅन सुरू केला जात आहे. यासोबतच, शिक्षण, कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाच्या जोरावर उत्पादकता वाढवण्यासाठी नागालँड आणि उत्तराखंडमध्ये दोन 'सेंटर्स ऑफ एक्सलन्स' (उत्कृष्टता केंद्र) स्थापन केले जात आहेत.

7

राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR), गोवा आणि कॅंटरबरी विद्यापीठ, न्यूझीलंड यांच्यात सामंजस्य करार

हा करार अंटार्क्टिक संशोधनातील सहकार्यासाठी एक चौकट तयार करतो. याद्वारे संयुक्त संशोधन, शैक्षणिक देवाणघेवाण, क्षमता बांधणी आणि दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या इतर वैज्ञानिक व शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देऊन भागीदारी मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.

8

राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था, कुंडली (NIFTEM-K) आणि मॅसी विद्यापीठ, न्यूझीलंड यांच्यात सामंजस्य करार

हा करार संशोधन, शैक्षणिक देवाणघेवाण, विद्यार्थ्यांची गतिशीलता (स्टुडंट मोबिलिटी) आणि परस्पर संमतीने ठरवलेल्या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहकार्यासाठी एक मजबूत पाया तयार करतो.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI completes 10 years, clocks nearly 13,000-fold rise in transaction volume

Media Coverage

UPI completes 10 years, clocks nearly 13,000-fold rise in transaction volume
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister invites citizens to share their UPI experiences as UPI completes a decade
August 25, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi recalled the transformative journey of the Unified Payments Interface (UPI), which was rolled out a decade ago and marked a major turning point in India’s digital payments journey.

Highlighting the scale and reach achieved by UPI over the past ten years, Shri Modi said that its remarkable journey is something every Indian can be proud of. The Prime Minister invited citizens to share their experiences of using UPI and how it has impacted their daily lives.

The Prime Minister posted on X:

A decade ago, UPI was rolled out, marking a major turning point in India’s digital payments journey.

The sheer scale and reach of UPI are something every Indian must be proud of.

Tell me about your UPI experience and how it impacted your life...

#10YearsOfUPI