जपानच्या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान वाहतूक , औषधनिर्माण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांतील जपानमधील आघाडीच्या उद्योग समूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश
जपानने मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या दृष्टिकोनाबद्दल व्यक्त केलेल्या दृढ वचनबद्धतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा

जपान -भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या 17 सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागा यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान वाहतूक, औषधनिर्माण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांतील जपानमधील आघाडीच्या उद्योग समूहांच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या भेटीत तात्सुओ यासुनागा यांनी पंतप्रधानांना येत्या 06 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या जपान - भारत व्यावसायिक सहकार्य समिती आणि भारत-जपान व्यावसायिक सहकार्य समितीच्या 48व्या  संयुक्त बैठकीची माहिती दिली. या भेटीत उच्च गुणवत्ता, भारतातील किफायतशीर  उत्पादन, जागतिक बाजारपेठेसाठी विशेषतः आफ्रिका खंडावर लक्ष केंद्रित करून भारताच्या उत्पादन क्षेत्राचा विस्तार तसेच मानवी संसाधनांचा विकास आणि परस्पर हस्तांतरणात वाढ करण्याच्या शक्यता अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली गेली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी उद्योग समुहाच्या भारतातील विस्तार योजनांची तसेच मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या दृष्टिकोनाशी त्यांनी व्यक्त केलेल्या दृढ वचनबद्धतेची प्रशंसा केली.  याशिवाय भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंधांचा महत्वाचा पाया असलेल्या कौशल्य विकासातील व्यापक सहकार्याचे महत्वही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi At SRCC:

Media Coverage

PM Modi At SRCC: "Those Who Pushed India Into 'Fragile 5' Can't Digest 7.8%"
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares moments from his metro journey to and from the SRCC programme
September 05, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today shared glimpses of his metro journey while traveling to and from the SRCC programme.

In a post on X, the Prime Minister shared:

"Metro moments…

On the way to the SRCC programme and back."