पत हमी योजनेत सुधारणा करणे हा एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून पतपुरवठयाचा प्रवाह वाढवण्यासाठी पतहमी योजनेत आणखी सुधारणा करण्यात आली आहे, अशी माहिती केन्द्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी एका ट्विट संदेशात दिली आहे.
राणे यांच्या ट्विटला दिलेल्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
"एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी आपल्या सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे."
This is a part of our Government's efforts to strengthen the MSME sector. https://t.co/EWdEZeNCVA
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2023


