नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने, या बैठकीबद्दल नमूद केले की,"सामायिक आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या लामिछाने यांच्या मनीषेचे पंतप्रधान स्वागत करत आहेत असून भारत त्यात पूर्णपणे सहभागी आहे" तसेच या भेटीने पंतप्रधानांना संतोष झाला असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटले आहे.

'शेजारी प्रथम' या धोरणाप्रमाणे नेपाळ हा भारताचा एक प्रमुख सहकारी आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. उभय देशांमधील विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी नव्या सरकारसोबत सहकार्य करण्यास भारत उत्सुक असल्याचेही  पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

"नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष राबी लामिछाने यांना भेटून मला आनंद झाला आहे. मी त्यांचे स्वागत करतो आणि सामायिक आणि समृद्ध भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या त्यांच्या मनिषेला दुजोरा देतो.

आमच्या 'शेजारी प्रथम' या धोरणानुसार नेपाळ हा आमचा एक प्रमुख भागीदार आहे आणि उभय देशांमधील विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी नवीन सरकारसोबत सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How ODOP is helping Pratapgarh turn its amla into a bigger business

Media Coverage

How ODOP is helping Pratapgarh turn its amla into a bigger business
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 1 सप्टेंबर 2026
September 01, 2026

#ModiHaiTohMumkinHai: Economy, Diplomacy and Atmanirbhar Milestones in One Social-Media Sweep