महाराष्ट्रातील सोलापूर येथे आग लागून झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे ;
"महाराष्ट्रातील सोलापूर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती सहवेदना. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना.
प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान" @narendramodi
"महाराष्ट्रात सोलापूर इथे आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना. जखमी झालेले लवकर बरे होवोत ही प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (PMNRF) प्रत्येक मृतांच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील : पंतप्रधान" @narendramodi