पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार आसाममधील पूरस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवून असून या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने शक्य ती सर्व मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारसोबत समन्वय राखून काम करत आहे.

ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

“गेल्या काही दिवसांमध्ये आसामच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधल्या परिस्थितीवर केंद्र सरकार निरंतरपणे लक्ष ठेवून  आहे आणि या आव्हानात्मक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शक्य ती सर्व मदत पुरविण्याच्या दृष्टीने आसाम राज्य सरकारसोबत एकत्र येऊन काम करत आहे.”

“पूरग्रस्त भागात भारतीय सेना तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके काम करत आहेत. तिथल्या नागरिकांना बाहेर काढून बचावकार्य करण्यासोबतच ती  पुरामुळे  प्रभावित झालेल्यांना मदत देखील करत आहेत. बचावकार्य प्रक्रियेचा भाग म्हणून हवाई दलाच्या विमानांनी त्या भागात 250 हून अधिक फेऱ्या केल्या आहेत.

“आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa,आसाम राज्य सरकारचे मंत्री तसेच अधिकारी पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये अहोरात्र काम करत असून पीडितांना मदत करत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच क्षेमकुशलतेसाठी मी प्रार्थना करतो आणि सर्वतोपरी मदत करण्याची  पुन्हा एकदा ग्वाही  देतो.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026

Media Coverage

'We'll provide AI skill training to 1 crore youth': PM Modi's big announcement on Independence Day 2026
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 ऑगस्ट 2026
August 15, 2026

Azadi Ka Amrit Mahotsav Continues: PM Modi’s Independence Day Vision Unites Growth, Youth Power & National Pride