पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खते विभागाच्या, खरीप हंगाम 2026 (01.04.2026 ते 30.09.2026) साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. खरीप हंगाम 2026 साठी अंदाजित अर्थसंकल्पीय आवश्यकता सुमारे 41,533.81 कोटी रुपये असेल. ही रक्कम खरीप 2025 हंगामाच्या अर्थसंकल्पीय आवश्यकतेपेक्षा अंदाजे 4,317 कोटी रुपयांनी अधिक आहे. खरीप 2025 साठीचा अर्थसंकल्प 37,216.15 कोटी रुपये होता.

फायदे:

शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरात खते उपलब्ध होतील याची खात्री केली जाईल.

खते आणि निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेऊन पी ॲन्ड के खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण केले जाईल.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे:

शेतकऱ्यांना या खतांची सुरळीत उपलब्धता परवडणाऱ्या दरात सुनिश्चित करण्यासाठी खरीप 2026 करिता मंजूर केलेल्या दरांनुसार (दिनांक 01.04.2026 ते 30.09.2026 पर्यंत लागू) डीएपी आणि एनपीकेएस ग्रेडसह पी अँड के खतांवर अनुदान दिले जाईल.

पार्श्वभूमी:

सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना डीएपी सह 28 दर्जाची पी अँड के खते अनुदानित दरात उपलब्ध करून देत आहे. पी अँड के खतांवरील अनुदान दिनांक 01.04.2010 पासून एनबीएस योजनेअंतर्गत येते. आपल्या शेतकरी-स्नेही दृष्टिकोनानुसार, सरकार शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पी अँड के खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर यांसारखी खते व निविष्ठांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेऊन, सरकारने डीएपी आणि एनपीकेएस ग्रेडसह फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांसाठी 01.04.2026 ते 30.09.2026 या कालावधीसाठी खरीप 2026 करिता एनबीएस दरांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित दरांनुसार अनुदान दिले जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना खते परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Kamal Haasan Backs PM Modi's Call To Save Energy Amid US-Iran War: 'India Will Emerge Stronger'

Media Coverage

Kamal Haasan Backs PM Modi's Call To Save Energy Amid US-Iran War: 'India Will Emerge Stronger'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the loss of lives in China mining accident
May 23, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today expressed deep sadness over the tragic loss of lives resulting from a mining accident in the Shanxi Province of China.

On behalf of the people of India, the Prime Minister extended his heartfelt condolences to President Xi Jinping and the people of China. Shri Modi prayed that the bereaved families find strength in this tragic hour, while also wishing for the early and safe recovery of all remaining missing persons.

The Prime Minister posted on X:

"Saddened by the loss of lives in a mining accident in Shanxi Province in China. On behalf of the people of India, my condolences to President Xi Jinping and the people of China. May the bereaved families find strength in this tragic hour. Praying for the early and safe recovery of all remaining missing persons."