पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तीन टक्के महागाई भत्ता देण्याला आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई दिलासा देण्याला मंजुरी दिली. वाढत्या महागाईतून दिलासा म्हणून सध्याच्या मूळ वेतन / निवृत्ती वेतनावरील 55 टक्के महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ जाहीर करण्यात आली असून ती 01.07.2025 पासून लागू होणार आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीमधील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 10083.96 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. महागाई भत्त्यातील या वाढीचा 49 लाख 19 हजार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना व 68 लाख 72 हजार निवृत्ती वेतनधारकांना लाभ होईल.
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार ही वाढ करण्यात आली आहे.


