पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने आज ओदिशामधील हायब्रिड ॲन्युइटी मोड (HAM) मार्गाच्या सहापदरी-नियंत्रित, कॅपिटल रीजन रिंग मार्गाच्या (भुवनेश्वर बायपास - 110.875 किमी) एकूण भांडवली खर्चासह 8307.74 कोटी रुपयांच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे.

सध्या, रामेश्वर ते टांगी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, कारण खोर्धा, भुवनेश्वर आणि कटक या शहरांकडे जाणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण जास्त असते. या आव्हानांना तोंड देण्यासाठी, हा प्रकल्प सहापदरी ॲक्सेस-नियंत्रित ग्रीनफील्ड महामार्ग म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. कटक, भुवनेश्वर आणि खोर्धा शहरांकडून जड व्यावसायिक वाहतूक वळवत; या प्रकल्पामुळे ओदिशा आणि पूर्वेकडील इतर राज्यांना मोठा फायदा होईल.तसेच यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, वाहतुकीचा खर्च कमी होईल आणि या प्रदेशात सामाजिक-आर्थिक विकास होईल.

या प्रकल्पाचे संरेखन तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग (NH-55, NH-57 आणि NH-655) आणि एक राज्य महामार्ग (SH-65) यांच्याशी एकत्रित केले आहे,ज्यामुळे ओदिशामधील प्रमुख आर्थिक, सामाजिक आणि वाहतूक नोड्सना अखंड सुरळीतपणे जोडले जाईल.याव्यतिरिक्त, सुधारीत केलेला कॉरिडॉर 10 आर्थिक, 4 सामाजिक आणि 5 वाहतूक विभागांना जोडून बहुविध वाहतूक व्यवस्था प्रदान करेल,एक प्रमुख रेल्वे स्टेशन, एक विमानतळ, एक प्रस्तावित बहुविध वाहतूक पार्क (MMLP) आणि दोन प्रमुख बंदरांसह बहुविध वाहतूक व्यवस्था निर्माण करेल ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात वस्तू आणि प्रवाशांची जलद वाहतूक करणे सुलभ होईल.

या विभागांतील प्रमुख धार्मिक आणि आर्थिक केंद्रांमधील संपर्क मजबूत करण्यात आणि व्यापार आणि औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी हा नवीन मार्ग पूर्ण झाल्यावर महत्त्वाची भूमिका बजावेल.या प्रकल्पामुळे अंदाजे 74.43 लाख प्रत्यक्ष प्रतिव्यक्ती-दिन रोजगार तसेच 93.04 लाख अप्रत्यक्ष प्रतिव्यक्ती-दिन रोजगारही निर्माण होईल आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये, विकास आणि समृद्धीचे नवीन मार्ग उघडले जातील.

मार्गाचा आराखडा पुढे दिला आहे

Appendix - I: Project Details

Feature

Details

Project Name

6-Lane Access-Controlled Greenfield Capital Region Ring Road (Bhubaneswar Bypass) from Rameshwar to Tangi

Corridor

Kolkata – Chennai

Length (km)

110.875

Total Civil Cost (Rs Cr.)

4686.74

Land Acquisition Cost (Rs Cr.)

1029.43

Total Capital Cost (Rs Cr.)

8307.74

Mode

Hybrid Annuity Mode (HAM)

Bypasses

Instant Project of Length 110.875 km

Major Roads Connected

National Highways – NH-55, NH-655 & NH-57.

State Highways – SH-65

Economic / Social / Transport Nodes Connected

Airports: Bhubaneswar

Railway Stations: Khordha

Port: Puri & Astrang

Economic Nodes: SEZ, Mega Food Park, Textile & Pharma Cluster, Fishing Cluster

Social Nodes: Aspirational District, Tribal District and LWE Affected District.

Major Cities / Towns Connected

Khordha, Bhubaneswar, Cuttack and Dhenkanal.

Employment Generation Potential

74.43 Lakhs Man-Days (direct) & 93.04 lakh Man-Days (indirect)

Annual Average Daily Traffic (AADT) in FY-25

Estimated at 28,282 Passenger Car Units (PCU)

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘All set for BRICS 2026!': PM Modi shares video of preparations at venue ahead of mega Summit

Media Coverage

‘All set for BRICS 2026!': PM Modi shares video of preparations at venue ahead of mega Summit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister expresses grief over loss of lives in mishap in Nanded
September 11, 2026
Prime Minister announces ex-gratia from PMNRF

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra.

The Prime Minister conveyed his thoughts to the bereaved families in this hour of grief and prayed for the speedy recovery of the injured.

Shri Modi announced that an ex-gratia of Rs. 2 lakh from the Prime Minister’s National Relief Fund (PMNRF) would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000.

In a post on X, the Prime Minister’s Office said;

“Saddened by the loss of lives due to a mishap in Nanded, Maharashtra. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. Praying for the speedy recovery of the injured.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi”