भारताने 2023 या वर्षात अनेक उपलब्धी प्राप्त केल्याने देशासाठी हे वर्ष प्रेरणादायी ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2023 मधील काही संस्मरणीय क्षण टिपणारी त्यांची या वर्षातील काही खास छायाचित्रे

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांची गळाभेट घेतली तो भावूक क्षण

दिलखुलास क्षण! चेन्नई, तामिळनाडू येथे पंतप्रधान मोदी दिव्यांग कार्यकर्त्यासोबत सेल्फी घेताना

पंतप्रधान मोदी वंदे भारत मधून प्रवास करताना आपल्या छोट्या दोस्तांसोबत गप्पागोष्टी करताना

7 लोककल्याण मार्गावरील आपल्या शासकीय निवासस्थानी गायींच्या सहवासात रमलेले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे 7, लोककल्याण मार्ग येथे आदरातिथ्य करताना

पिथौरागढच्या गुंजी गावात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी तेथील वृद्ध महिलेचे आशीर्वाद घेताना

हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पंतप्रधान मोदी कुत्र्याला मायेने कुरवाळून खाऊ घालताना

पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्याला त्याची चालण्याची काठी उचलण्यास मदत करताना

कार्यकर्त्यांविषयी आपुलकी असलेला माणूस. मिळालेल्या थोड्याशा वेळात कर्नाटकात कोलार येथील भाजपा कार्यकर्त्यांशी गप्पागोष्टी

पंतप्रधान मोदी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्यासमवेत भारतीय पान चाखून पाहताना

पंतप्रधान मोदी 'पवित्र सेंगोल' संसदेच्या नवीन इमारतीत घेऊन जाताना

पंतप्रधान मध्य प्रदेशातील शहडोलच्या पकारिया गावात मुलांशी बातचीत करताना

अयोध्येतील पीएम उज्ज्वला लाभार्थीच्या घरी पंतप्रधान मोदी चहाचा आस्वाद घेताना

नवी दिल्लीतील G20 लीडर्स समिटमध्ये पंतप्रधान मोदी भारताचे प्रतिनिधित्व करतान

यशोभूमी येथे 'पीएम विश्वकर्मा' योजनेच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मांसोबत संवाद साधताना

पंतप्रधान मोदी बेंगळुरूमधील एचएएल मध्ये तेजस विमानातून उड्डाण करताना

फ्रान्समध्ये बॅस्टिल डे 2023 च्या सोहळ्यात पंतप्रधान मोदी त्यांचे जवळचे मित्र फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत.

विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान मोदी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे सांत्वन करताना

अहमदाबादमधील रोबोटिक पार्कमध्ये रोबोटद्वारे पंतप्रधान मोदींना चहा देण्यात आला

पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील पार्वती कुंड येथे प्रार्थना करताना

बिकानेरमधील रोड शो वेळी पंतप्रधान मोदींचा ताफा पावसातून सायकलस्वारांसोबत जाताना

पंतप्रधान मोदी मुंबईतील मरोळ येथे अल्जामिया-तुस-सैफीयाह (द सैफी अकादमी) च्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी

COP28 शिखर परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेताना


