पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्याच्या ऐतिहासिक 'रेड रोड'वर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. मानवतेला मिळालेली भारताची ही अमूल्य देणगी साजरी करण्यासाठी ते सर्व स्तरांतील हजारो नागरिकांमध्ये सहभागी झाले होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले; योग हा संतुलन, निरामय आयुष्य आणि मानवी एकतेचा मार्ग असल्याचे सांगत त्यांनी यंदाची संकल्पना "निरोगी वृद्धत्वासाठी योग" यावर विशेष भर दिला.
येथे काही क्षणचित्रे आहेत...















