स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये दीपा मलिक या देखील होत्या. पंतप्रधान मोदी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले, तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी खेळाडू अत्यंत उत्साहाने व्हीलचेअरवर असलेल्या दीपा मलिक यांना  जवळजवळ ढकलून पुढे येत होते. हे पाहून, पंतप्रधानांनी इतरांना तिच्या पाठीच्या कण्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या.
असल्या कारणाने तिला रेटू नका असे सांगितले

पंतप्रधान मोदींना आपल्याबद्दल असलेली ही काळजी पाहून आपण हेलावून गेलो होतो तसेच त्यांना आपली इतकी काळजी आहे या गोष्टीचा आनंदही वाटला होता, असे दीपा मलिक यांनी हा प्रसंग कथन करताना सांगितले. आपल्याला बाजूला ढकलून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान मोदींनी थांबवले आणि तिला लोकांचा धक्का लागू नये म्हणून वाचविण्यासाठी त्यांनी स्वतः  तिच्या डोक्यामागे आपला हात ठेवला होता, अशी आठवणही तिने सांगितली.   

दीपा म्हणाली, “लोकांनी मला बाजूला करून अक्षरशः माझ्या अंगावरून त्यांच्यापाशी जाण्याचा प्रयत्न केला. मग मोदीजींनी पटकन माझ्या डोक्यामागे हात ठेवला आणि लोक माझ्यावर पडण्यापासून मला वाचवले. माझ्या पाठीवर अनेक शस्त्रक्रिया झाल्या असल्याने मला धक्का लागू देऊ नका असेही त्यांनी त्यांना सांगितले. माझ्या पाठीच्या कण्यातील दुखापतींची पंतप्रधानांना आठवण होती याचा आणि त्यांनी माझे संरक्षण केले याचे मला खूप समाधान वाटले होते. ”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s electric PV retail sales jump 44% in February; Tata Motors leads: FADA

Media Coverage

India’s electric PV retail sales jump 44% in February; Tata Motors leads: FADA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 मार्च 2026
March 07, 2026

Reform, Perform and Transform: PM Modi’s Mantra for India’s Growth