कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' युद्धनौकांच्या जलावतरण समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 12:51 pm
आजचा दिवस अनेक अर्थांनी विशेष आहे. संपूर्ण जग 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करत आहे. मला आनंद आहे की या निमित्ताने मला बंगालच्या या महान भूमीवर येण्याची संधी मिळाली. ही ती भूमी आहे जिने भारताच्या विचारांना नवी दिशा दिली, भारताच्या पुनर्जागरणाला गती दिली आणि जिने शतकानुशतके भारताला सागरी मार्गाने जगाशी जोडले. आज याच भूमीवर 'आत्मनिर्भर भारत', 'सुरक्षित भारत' आणि 'विकसित भारत' शी संबंधित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होत आहे. काही वेळापूर्वीच 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस दुनागिरी' आणि 'आयएनएस संशोधक' यांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. योगायोगाने, 21 जून हा दिवस 'जागतिक जलविज्ञान दिन' (World Hydrography Day) म्हणूनही साजरा केला जातो. आणि हा एक विलक्षण योगायोग आहे की याच दिवशी भारताचे सर्वात प्रगत हायड्रोग्राफी जहाज, 'आयएनएस संशोधक ' नौदलात सामील करण्यात आले आहे. मी भारतीय नौदल, या प्रकल्पांशी संबंधित सर्व शास्त्रज्ञ, अभियंते, कामगार आणि माझ्या प्रिय देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता इथे श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर स्वदेशी रचना आणि स्वदेशी बनावटीच्या तीन जहाजांचे – आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय यांचे जलावतरण
June 21st, 12:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरावर, स्वदेशी बनावटीच्या आणि रचनेच्या तीन नौदल जहाजांचे - 'आयएनएस दुनागिरी' (एक प्रगत 'स्टेल्थ' फ्रिगेट), 'आयएनएस संशोधक' (एक मोठे टेहळणी जहाज) आणि 'आयएनएस अग्रय' (पाणबुडी-विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका ) जलावतरण करण्यात आले. या जहाजांच्या समावेशामुळे देशाच्या नौदल क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल , सागरी क्षेत्राप्रती जागरूकता वाढेल आणि भू-राजकीय धोक्यांपासून आपल्या किनारपट्टीच्या जलक्षेत्राची सुरक्षा अधिक मजबूत होईल. या तिन्ही जहाजांचे संरेखन भारतीय नौदलाच्या 'वॉरशिप डिझाइन ब्युरो'ने केले असून त्यांची बांधणी कोलकात्यातील 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स' (GRSE) द्वारे करण्यात आली; यामध्ये 200 हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह भारतीय उद्योगांचा मोठा सहभाग होता. 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर असलेली ही जहाजे आत्मनिर्भरतेप्रति भारताच्या वचनबद्धतेचा एक उत्तम दाखला आहेत.Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28th, 12:15 pm
PM Modi inaugurated Phase 1 of Noida International Airport at Jewar in Uttar Pradesh and said that the occasion marks a new chapter in the Viksit UP, Viksit Bharat Abhiyan. He noted that the government has resolved to make India self-reliant in the MRO sector. Highlighting the government’s achievements in recent weeks, even as the world grapples with the conflict in West Asia, he called for collective effort and national unity.उत्तरप्रदेशात नोएडा इथे, सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 28th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात जेवर इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या प्रगतीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करत, हा सोहळा, विकसित उत्तरप्रदेश आणि विकसित भारताच्या गाथेत एक नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे. पहिले कारण म्हणजे, आपणच या विमानतळाच्या कामाची पायाभरणी केली होती, आणि आज आपल्यालाच त्याचे उद्घाटनही करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरे आनंदाचे कारण या भव्य विमानतळाच्या नावाचा उत्तरप्रदेशशी जवळचा संबंध आहे. “या प्रदेशाचा खासदार म्हणून, हे राज्य माझ्या विशेष जवळचे राज्य आहे, आणि आता या शहराची ओळखच या भव्य विमानतळाशी जोडलेली असेल.” असे सांगत, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांचे अभिनंदन केले.मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी
November 30th, 11:30 am
या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.