भारत सिंगापूर संयुक्त निवेदन
September 04th, 08:04 pm
सिंगापूरचे पंतप्रधान मा. लॉरेन्स वाँग यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने, भारत आणि सिंगापूर यांच्यातील सर्वंकष सामरिक भागीदारीसाठीच्या कार्ययोजना (रोडमॅप) विषयक संयुक्त निवेदनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरच्या पंतप्रधानांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेतील निवेदन
September 04th, 12:45 pm
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान वोंग यांच्या पहिल्या भारत भेटीचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. ही भेट आणखी खास आहे कारण यावर्षी आम्ही द्विपक्षीय संबंधांचा साठावा वर्धापनदिन साजरा करत आहोत.फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे माध्यमांसाठी निवेदन
August 05th, 11:06 am
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. या वर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्यातील राजनैतिक संबंधांचे पंचाहत्तरवे वर्ष साजरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा ठरतो. आमच्यातील राजनैतिक संबध नवीन असले, तरी आमच्या संस्कृतींमधील संपर्क फार प्राचीन काळापासूनचा आहे. फिलीपिन्सचे रामायण - महाराडिया लावना - हे आमच्यातील शतकानुशतके जुन्या सांस्कृतिक संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय फुलांचे चित्र असलेले नुकतेच जारी केलेले टपाल तिकिट आमच्यातील मैत्रीचा सुगंध पसरवत आहे.