अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिवान यांनी पंतप्रधानांना अमेरिका- भारतादरम्यान विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य विषयक प्रगतीची माहिती दिली
पंतप्रधान मोदी यांचे अमेरिकेत स्वागत करण्यास राष्ट्राध्यक्ष जो बायडन उत्सुक असल्याची सुलिवान यांची माहिती
भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी दिवसेंदिवस वृध्दींगत आणि दृढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले समाधान
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत संवाद साधण्यास आपणही उत्सुक असल्याची पंतप्रधानांनी व्यक्त केली भावना
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.

अमेरिकेचे  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.

एन एस ए सुलिवान यांनी पंतप्रधान मोदी यांना दोन्ही देशातील विविध क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्य विषयक प्रगतीची माहिती दिली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत, असेही सुलीवान यांनी सांगितले.

दोन्ही देशातील सर्वसमावेशक जागतिक राजनैतिक भागीदारी दिवसेंदिवस अधिक वृध्दींगत आणि दृढ होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत परस्पर हिताच्या विविध द्विपक्षीय,प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यास आणि अमेरिकेचा दौरा अधिकाधिक फलदायी करण्यास आपण उत्सुक आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
PM Modi Crosses 100 Million Followers On X, Becomes Most Followed World Leader

Media Coverage

PM Modi Crosses 100 Million Followers On X, Becomes Most Followed World Leader
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 जुलै 2024
July 15, 2024

From Job Creation to Faster Connectivity through Infrastructure PM Modi sets the tone towards Viksit Bharat