पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 1 ऑक्टोबर 2019 रोजी, दिल्ली येथील विज्ञान भवनात, ‘आरोग्य मंथन’ या कार्यक्रमाचा समारोप करतील. ‘आयुष्मान भारत’ या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, ‘आरोग्य मंथन’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण या संस्थेने आयोजन केले आहे.
यावेळी पंतप्रधान आयुष्यमान भारताच्या नवीन मोबाईल ॲप्लीकेशनचे उद्घाटन करतील तसेच ‘आयुष्यमान भारत स्टार्ट ग्रँड चॅलेंज’ या कार्यक्रमाला सुरुवात करतील आणि एका स्मृती टपाल चिन्हाचेही विमोचन करतील.
मागील वर्षी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवितांना आलेल्या अडचणी आणि आव्हाने यांच्यावर चर्चा करण्यासाठी ‘आरोग्य मंथन’ या कार्यक्रमाद्वारे एक व्यासपीठ भागधारकांना देण्यात आले आहे.
या योजनेच्या भविष्यातील अंमलबजावणीसाठी उपयुक्त योजना, सूचना संबंधित भागधारकांकडून या कार्यक्रमाद्वारे मागवण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पंतप्रधानांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू केली आहे.