पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय छात्र सेनेच्या करिअप्पा मैदानावर होणाऱ्या पीएम रॅलीला 28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता संबोधित करणार आहेत.
एनसीसीच्या प्रजासत्ताक सोहळ्याची सांगता दरवर्षी 28 जानेवारी रोजी या रॅलीने होते. कार्यक्रमात पंतप्रधानांना मानवंदना देण्यात येईल तसेच पंतप्रधानांसमोर एनसीसी चमुचे सैन्य कृती, स्लिदरींग, हेलिकॉप्टर कवायती, पॅरासेलिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट कॅडेटसला पंतप्रधानांच्या हस्ते पदक आणि बॅटन प्रदान करण्यात येईल.