पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे  अध्यक्ष  इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज इटलीतील अपुलिया येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.

उभय नेत्यांनी भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला , यात  'होरायझन 2047' मार्गदर्शक आराखडा आणि हिंद-प्रशांत मार्गदर्शक आराखड्यावर प्रामुख्याने भर होता. तसेच  संरक्षण, आण्विक, अंतराळ, शिक्षण, हवामान कृती, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि राष्ट्रीय संग्रहालय भागीदारी यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहकार्य आणि उभय देशांमधील जनतेतील संबंध वृद्धिंगत कारण्याबाबत चर्चा झाली. ‘मेक इन इंडिया’वर अधिक लक्ष केंद्रित करून धोरणात्मक संरक्षण सहकार्य अधिक दृढ  करण्याबाबत त्यांनी  सहमती दर्शवली.

 

2025 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित होणाऱ्या आगामी एआय शिखर परिषद आणि संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या संदर्भात एकत्रितपणे  काम करताना कृत्रिम बुद्धिमत्ता ,महत्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याबाबत देखील  त्यांनी सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवरही आपली मते मांडली.स्थिर आणि समृद्ध जागतिक व्यवस्थेसाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील मजबूत आणि विश्वासार्ह धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची असल्यावर  त्यांनी भर दिला आणि ती नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सहमती दर्शवली.

 

आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांसाठी  पंतप्रधानांनी अध्यक्ष मॅक्रॉन यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official

Media Coverage

Jan Dhan accounts hold Rs 2.75 lakh crore in banks: Official
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 डिसेंबर 2025
December 07, 2025

National Resolve in Action: PM Modi's Policies Driving Economic Dynamism and Inclusivity