पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 31 जानेवारी 2022 रोजी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) 30 व्या स्थापना दिनानिमित्त दुपारी 4:30 होणाऱ्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना ‘शी द चेंज मेकर’ अशी आहे, विविध क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा महोत्सव साजरा करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात विविध राज्यांतील राज्य महिला आयोग, राज्य सरकारांमधील महिला आणि बाल विकास विभाग, विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला उद्योजक आणि व्यावसायिक संघटना सहभागी होणार आहेत. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.