पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 24 मे, 2022 रोजी जपानचे माजी पंतप्रधान योशिरो मारी आणि शिंजो आबे यांची जपानमध्‍ये टोकियो येथे भेट घेतली. योशिरो मोरी हे जपान-इंडिया असोसिएशन (जेआयए)चे विद्यमान अध्‍यक्ष आहेत. तर शिंजो आबे लवकरच या असोसिएशनचे अध्‍यक्षपद स्वीकारणार आहेत. जेआयएची स्थापना 1903 मध्‍ये झाली आहे. जेआयए ही जपानमधील सर्वात जुन्या  मैत्री संघटनांपैकी एक  आहे.

भारत आणि जपान यांच्यातील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्‍ये देवाण-घेवाण वाढविण्‍यासाठी योशिरो मोरी यांच्या नेतृत्वाखाली जेआयएने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.  शिंजो आबे यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्‍छा दिल्या; तसेच जेआयए यापुढेही अशीच महत्वपूर्ण  भूमिका पार पाडेल, अशी  अपेक्षा व्यक्त केली.

भारत –जपान यांच्यातील  विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीविषयी व्यापक स्‍तरावर यावेळी नेत्यांनी चर्चा केली. तसेच शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद-प्रशांत  क्षेत्रासाठी भारत आणि जपानच्या सामायिक दृष्टिकोनावरही यावेळी नेत्यांनी चर्चा केली. उभय देशातल्या लोकांमध्‍ये  संबंध अधिक  दृढ व्हावेत  यासाठीच्‍या मार्गांवर चर्चा करण्यात आली.   

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Regional rural banks are helping Indias growth story

Media Coverage

Regional rural banks are helping Indias growth story
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi arrives in Alberta, Canada
June 17, 2025

Prime Minister Narendra Modi arrived in Canada a short while ago. He will take part in the G7 Summit.