पश्चिम बंगालमधील जलपैगुडी इथे दुर्गापूजेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
या अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे;
“पश्चिम बंगालच्या जलपैगुडी इथे दुर्गापूजेदरम्यान झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. ह्या अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. PM @narendramodi ”
"या दु:खद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपये मदत दिली जाईल, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. PM @narendramodi"
Anguished by the mishap during Durga Puja festivities in Jalpaiguri, West Bengal. Condolences to those who lost their loved ones: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 5, 2022