पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज गांधी स्मृती येथे आयोजित प्रार्थना सभेत सहभागी झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंच्या प्रयत्नांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली आणि भारताच्या वाटचालीवर एक अमिट ठसा उमटवला, त्याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या प्रत्ययास येतो.
पंतप्रधानांनी ‘एक्स’या समाज माध्यमावर पोस्ट केले :
"गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेत भाग घेतला.
बापूंचे जीवन लाखो लोकांना आशा देते. त्यांच्या प्रयत्नांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली आणि भारताच्या वाटचालीवर एक अमिट ठसा उमटवला, ज्याचा प्रभाव पिढ्यानपिढ्या प्रत्ययास येतो."
Attended a prayer meeting at Gandhi Smriti.
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2026
Bapu’s life gives hope to millions. His efforts reshaped the course of our freedom movement and left a strong mark on India’s journey that continues to be felt across generations. pic.twitter.com/uVJhwOQsv0


