शेअर करा
 
Comments
The Union Government is focused on improving ease of doing business in India and enhancing quality of life for citizens: PM Modi
India is today the fastest growing major economy: PM Modi
India's rising economy, fast growing middle class and young demography offer many new opportunities to Japanese investors, says PM

जपानमधल्या टोकिओ येथे आयोजित “मेक इन इंडिया: आफ्रिकेतील भारत-जपान भागीदारी आणि डिजिटल भागीदारी” या विषयावरील चर्चासत्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

व्यवसायात तसेच नागरिकांच्या जीवनमानातील सुलभता अधिक वृद्धींगत करण्यावर सरकार कशाप्रकारे लक्ष केंद्रीत करत आहे हे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या जपानी कंपन्यांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. गेल्या चार वर्षातील भारताच्या आर्थिक कामगिरीचे सामर्थ्य पंतप्रधानांनी विस्तृतपणे विषद केले. भारत आज सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले. डिजिटल व्यवहार, वस्तू आणि सेवा कर तसेच अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून औपचारिक अर्थव्यवस्थेकडे झालेल्या प्रवासाचा त्यांनी उल्लेख केला.

भारताची विकसित होणारी अर्थव्यवस्था, वेगाने वाढणारा मध्यम वर्ग आणि वाढती तरुण लोकसंख्या यामुळे जपानी गुंतवणुकदारांना अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात बोलतांना त्यांनी कमी खर्चिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान उद्योग आदी विभागांचा उल्लेख केला.

भारत आणि जपानमधल्या समान मूल्यांवरही पंतप्रधानांनी भर दिला. इंडो-पॅसिफिक, दक्षिण आशिया आणि आफ्रिका यासह जगाच्या अन्य भागात मजबूत विकासात्मक भागीदारी करण्याकडे दोन्ही देशांनी पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

Click here to read full text speech

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
21 Exclusive Photos of PM Modi from 2021
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
India among top 10 global AI adopters, poised to grow sharply: Study

Media Coverage

India among top 10 global AI adopters, poised to grow sharply: Study
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जानेवारी 2022
January 21, 2022
शेअर करा
 
Comments

Citizens salute Netaji Subhash Chandra Bose for his contribution towards the freedom of India and appreciate PM Modi for honoring him.

India shows strong support and belief in the economic reforms of the government.