पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशवासीयांचा खादीशी असलेला संबंध रोजगाराला चालना देण्यासोबतच रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे कि कारागिरांचे कौशल्यवर्धन करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यात खादी ग्रामोद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
खादी ग्रामोद्योगाने 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत एकूण 77887.97 कोटी रुपये किमतीचे उत्पादन केले, 108571.84 कोटी रुपयांची विक्री केली आणि 1.72 कोटी रोजगार निर्माण केले असेही त्यांनी सांगितले.
एमएसएमई मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;
“ही कामगिरी उत्साहित करते! देशवासियांचा खादीशी असलेला हा संबंध रोजगाराला चालना देण्याबरोबरच रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
ये उपलब्धियां उत्साहित करती हैं! खादी से देशवासियों का यह जुड़ाव रोजगार को बढ़ावा देने के साथ-साथ नित नए रिकॉर्ड बना रहा है। https://t.co/3kJDiRnSyi
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2023


