पंजाब आणि हरियाणामध्ये हायब्रिड ऍन्युइटी मोडवर 1878.31 कोटी रुपये किमतीच्या 19.2 किमी लांबीच्या 6 पदरी प्रवेश नियंत्रित झिरकपूर बायपासच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

April 09th, 03:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने पंजाब आणि हरियाणा राज्यात राष्ट्रीय महामार्ग (मूळ) अंतर्गत हायब्रिड ऍन्युइटी मोड वर राष्ट्रीय महामार्ग-7 (झिरकपूर-पटियाला) जंक्शनपासून सुरू होणारा आणि राष्ट्रीय महामार्ग-5 (झिरकपूर-परवाणू) जंक्शनवर संपणारा 19.2 किमी लांबीचा 6 पदरी झिरकपूर बायपास बांधण्यास मान्यता दिली आहे. हा प्रकल्प पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा तत्त्वानुसार एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.