PM expresses happiness at enthusiasm of young friends from Uzbekistan

August 29th, 05:46 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi expressed happiness at the enthusiasm of young friends from Uzbekistan ahead of his visit to the country. Sharing a video showcasing their enthusiasm, the Prime Minister said that it was especially heartwarming to see them express themselves so beautifully in Hindi.

पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित

August 26th, 10:22 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

जगातील सर्व देशांचे लक्ष आता भारतीय स्टार्ट-अप्सकडे असणार आहे: अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी

August 23rd, 11:42 am

पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि एका नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक अंतराळयाने, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारतातील पहिले अंतराळ-औषध क्षेत्रातील स्टार्टअप यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.

पंतप्रधान मोदींनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी साधला संवाद

August 23rd, 11:30 am

पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी संवाद साधला; ज्यामध्ये त्यांनी नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक स्पेसक्राफ्ट, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारताची पहिली स्पेस-फार्मा स्टार्ट-अप यासह अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद

August 21st, 09:00 pm

इकोनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 मध्ये पंतप्रधानांच्या संबोधनाचा मराठी अनुवाद

PM Modi addresses the Economic Times World Leaders Forum 2026

August 21st, 08:25 pm

While addressing the Economic Times World Leaders Forum 2026, PM Modi highlighted India's next-generation reform journey, from governance and policy reforms to Ease of Living and Ease of Doing Business. He underlined how these reforms are driving growth, creating opportunities and strengthening India's foundation for a Viksit Bharat.

अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा

August 21st, 02:21 pm

पंतप्रधानांनी 20 स्पेस स्टार्ट-अप्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या खाजगी अंतराळ परिसंस्थेवर आणि जागतिक प्रतिभा, कंपन्या व गुंतवणूक आकर्षित करण्याच्या तिच्या क्षमतेवर भर दिला. त्यांनी अंतराळ तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर, उद्योग क्षेत्रातील मजबूत सहकार्य आणि तरुण पिढीला अंतराळाविषयी प्रेरित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांची तिसरी उच्चस्तरीय बैठक

August 20th, 09:37 pm

भारत सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांनी आज त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी, एक उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. पायाभूत सुविधा आणि संपर्क/दळणवळण व्यवस्था, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार तसेच प्रशासन अशी मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांशी चर्चा करत, पंतप्रधानांनी या विभागांच्या भविष्यातील अजेड्यांवर चर्चा केली.

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे.

August 15th, 04:44 pm

पंतप्रधान मोदी यांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या 12 वर्षांतील उत्पादन, डिजिटल विकास आणि नागरिक सेवा पुरवठ्यातील भारताच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल मांडला. राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सात महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या परिवर्तनात्मक 'सप्तधारा' संकल्पनेचेही अनावरण केले.

परिवर्तनाची 12 वर्षे : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली भारताची प्रगती

August 15th, 01:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, गेल्या 12 वर्षात देशात झालेले परिवर्तन अधोरेखित करत, उत्पादन क्षेत्र, डिजिटल पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, युवा सक्षमीकरण, नवोन्मेष, सामाजिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि प्रगती विशद केली.

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

August 15th, 01:01 pm

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, क्रीडा, नागरी संरक्षण, अर्धसंवाहक निर्मिती, अणुऊर्जा आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रम आणि उद्दिष्टांची घोषणा केली.

विकसित भारताच्या पुढील झेपेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून आवाहन

August 15th, 12:51 pm

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनविण्याच्या प्रवासाला वेग देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण आवाहने केली. देशाची कार्यसंस्कृती, विचारसरणी आणि महत्त्वाकांक्षेची व्याप्ती बदलण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नागरिक, सरकार, उद्योग, शेतकरी, युवक आणि समाजातील इतर घटकांना सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी पंतप्रधानांच्या संवादाचा मूळ मजकूर

August 10th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी साधला संवाद

August 10th, 09:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय पदकविजेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात भारतीय क्रीडा क्षेत्रात झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला आणि आपल्या 12 ते 13 वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रीय खेळाडूंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करणे ही एक नियमित आणि अभिमानास्पद परंपरा झाल्याचे अधोरेखित केले.

आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

August 08th, 11:15 am

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधीत

August 08th, 11:00 am

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) दिल्ली संकुलाच्या 57 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. या समारंभाचे भावनिक महत्त्व त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केले. या संकुलातील प्रफुल्ल आणि स्वप्नांनी भारलेल्या वातावरणाचे स्मरणही त्यांनी करून देले. जगभरात आलेल्या कोविड साथरोगाच्या काळात आपण दूरस्थ पद्धतीने अशाच समारंभाला उपस्थित राहिल्याच्या आठवणींना त्यांनी यानिमित्ताने उजाळा दिला. आता पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल आपल्याला खूपच समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज या संकुलात या विद्यार्थ्यांसोबत आपला अनुभव सामायिक करायला मिळणे हा आपल्यासाठी खूप विशेष क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.

Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth

August 04th, 11:25 am

PM Modi shared a Sanskrit Subhashitam celebrating the dedication and perseverance of India's youth. He noted that constant learning and sincere effort sharpen talent, inspiring young Indians to make the nation proud.

'नशा मुक्त युवा के लिए विकसित भारत संकल्प अभियाना'च्या शुभारंभाप्रसंगी पंतप्रधानांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

August 02nd, 11:25 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा-विकसित भारत संकल्प अभियाना'चा शुभारंभ

August 02nd, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियाना'चा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी, 28,000 हून अधिक ठिकाणांहून जोडल्या गेलेल्या एक कोटीहून अधिक युवा नागरिकांसह उपस्थित विविध जनसमुदायाचे औपचारिक स्वागत केले. या क्षणाचे सामूहिक गांभीर्य व महत्त्व अधोरेखित करत त्यांनी, यातून सखोल राष्ट्रीय कटिबद्धता दिसून येत असल्याचे नमूद केले. आज आपण सर्व देशवासीय एका महान आणि महत्त्वाच्या संकल्पासाठी एकत्र आलो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा करणार प्रारंभ

August 01st, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नशामुक्त युवा -विकसित भारत संकल्प अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. युवकांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करणे आणि आपल्या समाजात सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे दूत बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.