India-Indonesia Joint Statement on the State Visit by Prime Minister of India to Indonesia
July 07th, 05:15 pm
At the invitation of Indonesian President Prabowo Subianto, PM Modi is on a State Visit to Indonesia from 6-8 July 2026. PM Modi's visit reflects the shared commitment of the two leaders to achieve a substantial upward trajectory in the India-Indonesia Comprehensive Strategic Partnership. The two leaders held discussions at Istana Merdeka in Jakarta, covering the full spectrum of bilateral relations.पंतप्रधानांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत अधिकृत चर्चा
July 07th, 02:51 pm
इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.पंतप्रधान मोदींचे जकार्ता येथे आगमन
July 06th, 05:03 pm
पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील जकार्ता येथे पोहोचले. विमानतळावर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक स्वागत केले.इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
July 06th, 09:00 am
मी 6-11 जुलै 2026 दरम्यान म्यानमार, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहे. इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, मी 6-8 जुलै दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहे. 2018 मधील माझ्या पहिल्या इंडोनेशिया भेटीदरम्यान भारत आणि इंडोनेशियाने द्विपक्षीय संबंधांना 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उंचावले होते. आपल्या द्विपक्षीय संबंधांना हे नवीन रूप मिळाल्यानंतरची ही माझी पहिलीच द्विपक्षीय भेट असेल, तसेच ही भेट अध्यक्ष प्रबोवो यांच्या भारत भेटीनंतर होत आहे, जे 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अतिशय बळकट सांस्कृतिक आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांसोबत संबंध आहेत आणि माझी ही भेट आमच्या बहुआयामी भागीदारीच्या सर्व पैलूंना अधिक बळकट करेल. या भेटीदरम्यान, मी इंडोनेशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधेन आणि अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता येथील 'प्रम्बानन मंदिर' संकुलाला भेट देईन, जे आमच्यातील घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांचे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण आहे.