योग चळवळीला बळकटी देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या योगान्ध्र उपक्रमाचे पंतप्रधानांकडून कौतुक
June 22nd, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या जनतेचे, दैनंदिन आयुष्यात योगअभ्यासाचा समावेश करण्यासाठी तसेच आरोग्य आणि निरोगी राहाण्याच्या देशव्यापी चळवळीला चालना देण्याच्या प्रेरणादायी वचनबद्धतेचे कौतुक केले.पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या ‘योगांध्र’ 2025 उपक्रमाचे केले कौतुक
June 03rd, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील चित्तूरजवळ आयोजित योगांध्र 2028 कार्यक्रमातील योगप्रेमींच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले. हा कार्यक्रम निसर्गरम्य चित्तूर - पुलीगुंडू या जोडून डोंगरमाथा (जुळी शिखरे) असलेल्या भागामध्ये आयोजित करण्यात आला होता. जिथे 2000 हून अधिक योगप्रेमी आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2025 पर्यंत महिनाभर चालणाऱ्या आंध्र प्रदेशातील कार्यक्रमाचा आरंभ करण्यासाठी जमले होते.