पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून साधला संवाद
June 24th, 09:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्रातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 20th, 04:42 pm
या वर्षीच्या जागतिक आरोग्य सभेची संकल्पना 'आरोग्यासाठी एक जग' आहे. ती भारताच्या जागतिक आरोग्यविषयक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. 2023 मध्ये जेव्हा मी या मेळाव्याला संबोधित केले तेव्हा मी 'एक पृथ्वी, एक आरोग्य' बद्दल बोललो होतो. निरोगी जगाचे भविष्य समावेशन, एकात्मिक दृष्टिकोन आणि सहकार्यावर अवलंबून असते.जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
May 20th, 04:00 pm
जिनिव्हा येथे आयोजित जागतिक आरोग्य सभेच्या 78 व्या सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा देऊन सभेच्या यावर्षीच्या ‘आरोग्यासाठी एक विश्व’ या संकल्पनेला अधोरेखित करत ही संकल्पना जागतिक आरोग्याबाबत भारताने पाहिलेल्या स्वप्नाशी सुसंगत आहे, यावर भर दिला.वर्ष 2023 मध्ये जागतिक आरोग्य सभेत आपण ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ संकल्पनेविषयी बोललो होतो अशी आठवण उपस्थितांना करून देत पंतप्रधान म्हणाले की, समावेशकता, एकात्मिक दूरदृष्टी आणि सहयोग यांच्यावर निरोगी विश्वाचे भवितव्य अवलंबून असते