उत्तराखंड राज्यात हर्शील येथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 06th, 02:07 pm
येथील उर्जावंत मुख्यमंत्री, माझे धाकटे बंधू पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्री श्री अजय टामटा जी, राज्याचे मंत्री सतपाल महाराज जी, संसदेतील माझे सहकारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट जी, संसदेतील माझ्या सहकारी माला राज्यलक्ष्मी जी, आमदार सुरेश चौहान जी, सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित हिवाळी पर्यटन कार्यक्रमाला केले संबोधित
March 06th, 11:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील हर्षील इथे आयोजित ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ते तिथल्या हिवाळी पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी त्यांनी मुखवा येथील माता गंगेच्या हिवाळी बैठकीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना ही केली. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी माणा गावातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि या दुर्घटनेत ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदनाही व्यक्त केल्या. या संकटकाळात संपूर्ण राष्ट्र त्यांच्या कुटुंबियांसोबत एकत्र उभे आहे, या सोबतीमुळे पिडीत कुटुंबांना प्रचंड बळ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान 6 मार्च रोजी उत्तराखंडला देणार भेट
March 05th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 6 मार्च रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.सकाळी 9:30 च्या सुमारास ते मुखवा या हिवाळा ऋतूतील वास्तव्यस्थानी गंगामातेची पूजा करून दर्शन घेतील.सकाळी सुमारे 10:40 वाजता, ते एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील आणि हरसिलमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत उपस्थितांना संबोधित करतील.