पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.

March 29th, 11:30 am

या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.

ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

April 15th, 09:54 am

ऑलिम्पिक पदकविजेत्या प्रसिद्ध क्रीडापटू कर्णम मल्लेश्वरी यांनी काल यमुनानगर येथे पंतप्रधानांची भेट घेतली. युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

कमालीची निष्ठा ! पंतप्रधान मोदींच्या भेटीची आस ठेवून 14 वर्षे अनवाणी फिरणारा हरियाणातील इसम

April 14th, 06:04 pm

यमुनानगर येथील जाहीर सभेत आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कैथल येथील श्री रामपाल कश्यप यांची भेट घेतली. चौदा वर्षांपूर्वी श्री कश्यप यांनी - नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत आणि त्यांच्यासोबत आपली प्रत्यक्ष भेट होईपर्यंत पायात जोडे घालणार नाही, अशी शपथ घेतली होती

हरयाणातील यमुनानगर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन/शिलान्यासप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

April 14th, 12:00 pm

हरयाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नायब सिंग सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, राव इंद्रजीत सिंग जी, कृष्णपाल जी, हरयाणा सरकारचे मंत्रीमंडळ, खासदार आणि आमदारगण आणि माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हरयाणातील माझ्या भावंडांना मोदींचा राम-राम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणात यमुना नगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

April 14th, 11:54 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणात यमुनानगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ झाला. हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा देऊन त्यांनी हरियाणाच्या पवित्र भूमीला आदरांजली वाहिली आणि ही भूमी माता सरस्वतीचे उत्पत्तिस्थान, मंत्रादेवीचे निवासस्थान, पंचमुखी हनुमानाची आणि पवित्र कपालमोचन साहिब यांची भूमी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. “हरियाणा म्हणजे संस्कृती, भक्ती आणि समर्पण यांचा संगम आहे,” ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा भारताच्या विकासात्मक वाटचालीला मार्गदर्शक ठरत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पंतप्रधान हरियाणाला भेट देणार

April 12th, 04:48 pm

आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जातील आणि सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवतील तसेच हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.