नवी दिल्लीत, भारत मंडपम येथे, वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 25th, 06:16 pm
‘वर्ल्ड फूड इंडिया’ या कार्यक्रमामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन! आजच्या या आयोजनात आपले शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार आणि ग्राहक, हे सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले आहेत. ‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा नव्या संपर्कांचा, नव्या संवादांचा आणि सर्जनशीलतेची एक पर्वणी ठरला आहे. मी थोड्याच वेळापूर्वी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनांना भेट देऊन आलो आहे. आनंदाची गोष्ट अशी की या प्रदर्शनात पोषणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, तेलाच्या वापरात बचत करण्यावर भर दिला आहे आणि पॅकबंद उत्पादनांची गुणवत्ता आणि पोषकता वाढवण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण आयोजनासाठी मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनःपूर्वक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमाला केले संबोधित
September 25th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार, नवोन्मेषक आणि ग्राहक हे सर्वजण या कार्यक्रमात एकाचवेळी उपस्थित असून , त्यामुळे वर्ल्ड फूड इंडिया नवीन संपर्क, नवीन जोडणी आणि सर्जनशीलतेचे व्यासपीठ बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आपण नुकतीच प्रदर्शनांना भेट दिली आहे असे सांगून पोषण, तेलाचा कमीत कमी वापर आणि पॅकेज केलेल्या उत्पादनांचा आरोग्यदायीपणा वाढवणे यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी कार्यक्रमातील सर्व सहभागींचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये उपस्थितांना संबोधित करणार
September 24th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:15 वाजता नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.विश्व भारतीय खाद्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
September 19th, 12:30 pm
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या आयोजनाबद्दल जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. जगातील विविध भागातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत आणि खूप शुभेच्छा.भारत मंडपम येथे विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 03rd, 11:00 am
या कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयलजी, गिरीराज सिंहजी,पशुपती पारसजी, पुरुषोत्तम रुपालाजी, प्रल्हाद सिंह पटेलजी, जगभरातील विविध देशांमधून आलेले सर्व पाहुणे, राज्य सरकारांतील मंत्री, उद्योगविश्व आणि स्टार्ट अप जगतातील सर्व सहकारी, देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले शेतकरी बंधू-भगिनी, स्त्री-पुरुषहो, तुम्हा सर्वांचे विश्व भारतीय खाद्य महोत्सवात स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन.पंतप्रधानांच्या हस्ते विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 चे उद्घाटन
November 03rd, 10:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी, ‘विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बचत गटाच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना बीज भांडवल सहाय्य वितरीत करण्यात आले. या प्रसंगी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला. भारताला ‘जगाचे फूड बास्केट’ या स्वरुपात सादर करणे तसेच 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’म्हणून साजरे करणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.पंतप्रधानांच्या हस्ते उद्या,3 नोव्हेंबर रोजी जागतिक भारतीय अन्न प्रदर्शन 2023 चे उद्घाटन
November 02nd, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जागतिक भारतीय अन्न 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे होणार आहे.