पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भगवान महावीर वनस्थली उद्यानात वृक्षारोपण करून एक पेड माँ के नाम उपक्रमाला दिले बळ, अरावली ग्रीन वॉल प्रकल्पांतर्गत अरावली पर्वतरांगांचे पुनर्वनीकरण करण्याचा केला संकल्प

June 05th, 01:33 pm

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथील भगवान महावीर वनस्थळी उद्यानात वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले आणि एक पेड माँ के नाम उपक्रमाला बळ दिले.पंतप्रधानांनी अरावली ग्रीन वॉल प्रकल्पांतर्गत अरावली पर्वतरांगांच्या पुनर्वनीकरणाचे महत्त्वही अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी दिल्लीत स्वच्छ तसेच हरित शहरी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस हिरवा झेंडा दाखवून केल्या रवाना

June 05th, 12:46 pm

शाश्वत विकास आणि स्वच्छ शहरी वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक)बसेसना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

जागतिक पर्यावरण दिनी नवी दिल्लीत पंतप्रधानांनी केले सिंदूर रोपट्याचे रोपण

June 05th, 11:50 am

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सिंदूर रोपटे लावले. हे रोपटे त्यांना गुजरातच्या कच्छमधील शूर माता आणि भगिनींनी भेट दिले, ज्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य साहस आणि देशभक्तीचे दर्शन घडवले होते.

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठीचे कार्य नव्या जोमाने सुरु करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन.

June 05th, 09:07 am

नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित वृत्तीने नव्या जोमाने कार्य करावे आणि पर्यावरण अधिकाधिक हरित आणि उत्तम बनवण्यासाठी मूलभूत पातळीवर काम करणाऱ्यांच्या अतुलनीय योगदानाचे कौतुक करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम

June 04th, 01:20 pm

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून 2025 रोजी सकाळी 10:15 वाजता नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी पार्क येथे एका विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये पर्यावरणीय देखभाल आणि हरित गतिशीलतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली जाईल.

संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

June 30th, 11:00 am

मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.

PM Modi's remarks at the G7 Summit Outreach Session in Italy

June 14th, 09:54 pm

At the Outreach Session of the G7 Summit on 'AI and Energy, Africa and Mediterranean,' PM Modi highlighted the usage of technology for human progress and spoke about how India is leveraging AI. He mentioned India's approach in the energy sector to be based on availability, accessibility, affordability and acceptability. He also reiterated India's commitment to the well-being of the Global South.

जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात झाले सहभागी

June 14th, 09:41 pm

इटलीमध्ये अपुलिया येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एनर्जी, आफ्रिका अँड द मेडिटरेनियन” या विषयावरील संपर्क सत्रात आपले विचार व्यक्त केले. 50 व्या वर्धापन दिनापर्यंत मजल मारण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांनी या समूहाचे अभिनंदन केले.

'एक पेड माँ के नाम' या मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ

June 05th, 02:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेचा आज प्रारंभ केला. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावले. आपल्या पृथ्वीला अधिक उत्तम करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना यावेळी केले. गेल्या दशकात, भारताने अनेक असे सामूहिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातील वनक्षेत्र वाढले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. हे आपल्या शाश्वत विकासाच्या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक पर्यावरण दिन 2023 निमित्त पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

June 05th, 03:00 pm

जागतिक पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना, देशभरातील आणि जगभरातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळवण्याचे अभियान ही आहे. आणि मला आनंद आहे की आज जग ज्याबाबत बोलत आहे त्यावर भारत गेली 4-5 वर्षे सातत्याने काम करत आहे. 2018 मध्येच, भारताने एकदा वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकपासून मुक्त होण्यासाठी दोन स्तरांवर काम करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे आम्ही एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे आणि दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे, भारतात सुमारे 30 लाख टन प्लास्टिक पॅकेजिंगचा पुनर्वापर करणे अनिवार्य झाले आहे. भारतात दरवर्षी निर्माण होणाऱ्या एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या 75 टक्के हे प्रमाण आहे. आणि आज सुमारे 10 हजार उत्पादक, आयातदार आणि ब्रँड मालक त्याच्या कक्षेत आले आहेत.

पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित बैठकीला व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित

June 05th, 02:29 pm

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

जर्मनीतील G7 शिखर परिषदेत ‘स्ट्रॉन्गर टुगेदर: अॅड्रेसिंग फूड सिक्युरिटी अँड अॅडव्हान्सिंग जेंडर इक्वॅलिटी’ या सत्रातील पंतप्रधानांच्या वक्तव्याचा मराठी अनुवाद

June 27th, 11:59 pm

जागतिक तणावाच्या वातावरणात आपण भेटत आहोत. भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिला आहे. सध्याच्या परिस्थितीतही भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचा सातत्याने आग्रह केला आहे. या भू-राजकीय तणावाचा प्रभाव फक्त युरोपपुरता मर्यादित नाही. ऊर्जा आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम सर्वच देशांवर होत आहे. विकसनशील देशांची ऊर्जा आणि सुरक्षा विशेषतः धोक्यात आहे. या आव्हानात्मक काळात भारताने अनेक गरजू देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून सुमारे 35,000 टन गहू आम्ही पाठविला आहे. तिथल्या भीषण भूकंपानंतरही मदत म्हणून साहित्य पोहोचवणारा भारत हा पहिला देश होता. अन्न सुरक्षेसाठी आम्ही शेजारी श्रीलंकेलाही मदत करीत आहोत.

जर्मनीमध्ये जी-7 शिखर परिषदेत “उत्तम भविष्यात गुंतवणूक: हवामान बदल, ऊर्जा आणि आरोग्य” या विषयावर पंतप्रधानांचे निवेदन

June 27th, 07:47 pm

जर्मनीमध्ये जी-7 शिखर परिषदेत “उत्तम भविष्यात गुंतवणूक: हवामान बदल, ऊर्जा आणि आरोग्य” या विषयावर पंतप्रधानांचे निवेदन

लाइफ मूव्हमेंट उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 05th, 07:42 pm

आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.

PM launches global initiative ‘Lifestyle for the Environment- LiFE Movement’

June 05th, 07:41 pm

Prime Minister Narendra Modi launched a global initiative ‘Lifestyle for the Environment - LiFE Movement’. He said that the vision of LiFE was to live a lifestyle in tune with our planet and which does not harm it.

पंतप्रधान 5 जूनला होणाऱ्या माती वाचवा चळवळीवरील कार्यक्रमास उपस्थित रहाणार

June 04th, 09:37 am

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवन येथे येत्या 5 जून रोजी सकाळी 11 वा. होणाऱ्या माती वाचवा चळवळीवरील (सेव्ह सॉईल) कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित जनसमुदायास पंतप्रधान संबोधितही करणार आहेत.

Start-ups are reflecting the spirit of New India: PM Modi during Mann Ki Baat

May 29th, 11:30 am

During Mann Ki Baat, Prime Minister Narendra Modi expressed his joy over India creating 100 unicorns. PM Modi said that start-ups were reflecting the spirit of New India and he applauded the mentors who had dedicated themselves to promote start-ups. PM Modi also shared thoughts on Yoga Day, his recent Japan visit and cleanliness.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 05th, 11:05 am

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, नरेंद्र सिंह तोमर जी, प्रकाश जावडेकर जी, पीयूष गोयल जी, धमेंद्र प्रधान जी, गुजरातमधल्या खेडा इथले खासदार देवुसिंग जेसिंगभाई चैहान जी, उत्तर प्रदेशमधल्या हरदोईचे खासदार जयप्रकाश रावत जी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ जी, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर भगिनी उषा जी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

June 05th, 11:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. सेंद्रीय शेती आणि कृषी क्षेत्रात बायोइंधनाचा वापर याबाबत पुण्यामधील एका शेतकऱ्याचे अनुभव पंतप्रधानांनी जाणून घेतले.