मुंबईत मेरीटाईम लीडर्स परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 29th, 04:09 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, शांतनु ठाकूर जी, कीर्तिवर्धन सिंह जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, नौवहन आणि इतर उद्योगांशी संबंधित नेते, इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले संबोधित
October 29th, 04:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित केले तसेच सागरी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे (ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम) अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी ग्लोबल मेरीटाईम लीडर्स परिषदेला उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम 2016 मध्ये मुंबईत सुरू झाला आणि आता तो जागतिक शिखर परिषद म्हणून विकसित झाला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 85 हून अधिक देशांचा सहभाग असणे, ही गोष्ट एक मजबूत संदेश देत आहे , यावर मोदी यांनी भर दिला. या कार्यक्रमात आघाडीच्या प्रमुख नौवहन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , स्टार्टअप्स, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांच्या उपस्थितीची त्यांनी दखल घेतली. छोटी बेटे असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, अशा सर्वांच्या सामूहिक दृष्टिकोनामुळे शिखर परिषदेची ऊर्जा आणि समन्वय लक्षणीयरीत्या वाढला आहे.पंतप्रधान 4 ऑक्टोबर रोजी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करणार
October 03rd, 03:54 pm
युवा विकासासाठीचा एक महत्वाचा उपक्रम म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सकाळी 11 वाजता 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करतील. यामुळे देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला निर्णायक चालना मिळेल. या कार्यक्रमात कौशल दीक्षांत समारंभ देखील आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, आयोजित होत असलेला हा चौथा राष्ट्रीय कौशल्य दीक्षांत समारंभ असेल. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी करणाऱ्या 46 विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
July 04th, 05:56 am
आज संध्याकाळी तुम्हा सर्वांसोबत असणे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान कमला जी यांच्या अद्भुत आदरातिथ्याबद्दल आणि दयाळू शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
July 04th, 04:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन स्वागत सोहळ्याचा अनुभव देण्यात आला.बिहारमध्ये सिवान येथे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
June 20th, 01:00 pm
मी सर्वांना नमन करतो. बाबा महेंद्रनाथ, बाबा हंसनाथ, सोहागरा धाम, माँ थावे भवानी, माँ अंबिका भवानी, प्रथम राष्ट्रपती देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या पावन भूमीवरील सर्वांना मी अभिवादन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. उपस्थितांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी बाबा महेंद्रनाथ आणि बाबा हंसनाथ यांना आदराने वंदन केले आणि सोहगरा धामच्या पवित्र उपस्थितीचा उल्लेख केला. त्यांनी माँ थावे भवानी आणि माँ अंबिका भवानी यांनाही वंदन केले. पंतप्रधानांनी देशाचे पहिले राष्ट्रपती, देशरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले.राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
May 07th, 02:07 pm
भारतातील व्यावसायिक शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण (ITI) संस्थांचे अद्ययावतीकरण करण्यास तसेच पाच नव्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय उत्कृष्टता कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यास मंजूरी दिली आहे.कौटिल्य अर्थशास्त्र परिषद 2024 च्या तिसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 04th, 07:45 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष एन.के. सिंग, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून आलेले इतर मान्यवर, आणि उपस्थित सभ्य स्त्री-पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेला केले संबोधित
October 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या कार्यक्रमाला संबोधित केले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या भागीदारीसह आर्थिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या या कौटिल्य आर्थिक परिषदेत, इतर अनेक मुद्द्यांसह, हरित स्थित्यंतराला वित्तपुरवठा, भूआर्थिक विखंडन आणि वृद्धीसाठीचे परिणाम यांसारख्या संकल्पनांवर आणि लवचिकता कायम राखण्यासाठी धोरणात्मक कृतीची तत्वे, यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (PGII) आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) साठी भागीदारी
September 09th, 09:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (पीजीआयआय) आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) साठी भागीदारी या विषयावरील विशेष कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषविले.पंतप्रधानांचे जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी (PGII) आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसाठी भागीदारी कार्यक्रमात निवेदन
September 09th, 09:27 pm
या विशेष सोहळ्यात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. माझे मित्र बायडन यांच्यासह या कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषवताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण सर्वानी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार संपन्न होताना पाहिले आहे. आगामी काळात हा करार भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यात आर्थिक समानव्य साधण्याचे एक प्रभावी माध्यम बनेल. हा करार संपूर्ण विश्वात संपर्क आणि विकासाला एक शाश्वत दिशा प्रदान करेल.NDA today stands for N-New India, D-Developed Nation and A-Aspiration of people and regions: PM Modi
July 18th, 08:31 pm
PM Modi during his address at the ‘NDA Leaders Meet’ recalled the role of Atal ji, Advani ji and the various other prominent leaders in shaping the NDA Alliance and providing it the necessary direction and guidance. PM Modi also acknowledged and congratulated all on the completion of 25 years since the establishment of NDA in 1998.PM Modi addresses the NDA Leaders Meet
July 18th, 08:30 pm
PM Modi during his address at the ‘NDA Leaders Meet’ recalled the role of Atal ji, Advani ji and the various other prominent leaders in shaping the NDA Alliance and providing it the necessary direction and guidance. PM Modi also acknowledged and congratulated all on the completion of 25 years since the establishment of NDA in 1998.ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 23rd, 08:54 pm
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन, येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भारतीय समुदायाबरोबर साधला संवाद
May 23rd, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आज (23 मे, 2023) भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला. सिडनीमधील कुडोस बँक एरिना भागात झालेल्या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.भारत आता वाणिज्य तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे: पंतप्रधान
May 01st, 03:43 pm
केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे.जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात भारताने 16 क्रमांकांची झेप घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
April 22nd, 07:54 pm
जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकात भारताने 16 क्रमांकांची झेप घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.हवामान बदलाचा सामना करण्यासंबंधी जागतिक बँकेच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
April 15th, 09:45 am
जागतिक बँकेच्या अध्यक्ष, मोरोक्कोच्या ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास मंत्री, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी निर्मला सीतारामन जी, लॉर्ड निकोलस स्टर्न, प्राध्यापक सनस्टीन आणि इतर मान्यवर अतिथी,पंतप्रधानांनी जागतिक बँकेच्या ‘मॅकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’’ यावरील कार्यक्रमाला केले संबोधित
April 15th, 09:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक बँकेच्या ‘मेकिंग इट पर्सनल: हाऊ बिहेविअरल चेंज कॅन टॅकल क्लायमेट चेंज’ या कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या संकल्पनेशी आपला वैयक्तिक संबंध असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आणि ही एक जागतिक चळवळ बनत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.