पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

May 04th, 08:21 am

'विकसित भारत' निर्माण करण्याचे सामुहिक स्वप्न साकार करण्यासाठी, उपराष्ट्रपती अथक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. संसदीय कामकाजाची उत्पादकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी ते सातत्याने करत असलेले प्रयत्न, त्यांची लोकशाही मूल्यांप्रती असलेली दृढ वचनबद्धता दर्शवतात, असे मोदी यांनी अधोरेखित केले.

होजे अंतोनियो कास्ट रिस्ट यांनी चिलीच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले

March 13th, 12:54 pm

होजे अंतोनियो कास्ट रिस्ट यांनी चिलीचे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि चिली या देशांदरम्यान असलेले स्नेहपूर्ण आणि मैत्रीचे संबंध आणखी बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील व्यापार, तंत्रज्ञान आणि उर्जा या क्षेत्रांतील सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी होजे यांच्यासह एकत्रित येऊन काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी यांनी सांगितले. “यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!”, मोदी म्हणाले.

बांगलादेश निवडणुकीतील विजयाबद्दल तारिक रहमान यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन ; द्विपक्षीय संबंधांविषयी भारताच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

February 13th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी केले 2026 च्या पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

January 25th, 07:16 pm

देशासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 09:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 09:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य स्थापना दिनानिमित्त मणिपूरच्या बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी मेघालयातील जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

January 21st, 09:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयातील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी पंतप्रधानांनी केली सदिच्छा व्यक्त

December 01st, 10:30 pm

बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनासाठी अनेक वर्षांपासून योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. यावेळी भारत सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार आहे, असे मोदी यांनी नमूद केले आहे.

पंतप्रधानांनी बीएसएफ स्थापना दिनानिमित्त सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या

December 01st, 06:18 pm

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की बीएसएफ हे भारताच्या अविचल निर्धाराचे आणि पराकोटीच्या व्यावसायिकतेचे प्रतीक आहे. “बीएसएफचे जवान अत्यंत आव्हानात्मक प्रदेशांमध्ये सेवा बजावतात. त्यांच्या धैर्यासोबतच त्यांची मानवतावादी भावना देखील विलक्षण आहे,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एल. के. अडवाणी यांची वाढदिवसानिमित्त घेतली भेट

November 08th, 08:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एल. के. अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की एल. के. अडवाणी यांची राष्ट्रसेवा विलक्षण आहे आणि ती आपणा सर्वांना प्रचंड प्रेरणा देणारी आहे.

छठ महापर्वाच्या समारोपानिमित्त पंतप्रधानांनी भाविकांना दिल्या शुभेच्छा

October 28th, 07:56 am

महापर्व छठ च्या समारोपानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी जवानांना दिल्या शुभेच्छा

October 16th, 09:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एनएसजी जवानांच्या अतुलनीय शौर्य आणि समर्पणाचे कौतुक केले आहे. दहशतवादाच्या धोक्यापासून देशाचे संरक्षण करण्यात, आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आणि महत्वपूर्ण राष्ट्रीय मालमत्तेचे संरक्षण करण्यात एनएसजीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी केले ब्रह्मचारिणी रुपाला वंदन

September 23rd, 09:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाला वंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे ‘समुद्र से समृद्धी’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

September 20th, 11:00 am

आपल्या भावनगरने तर अगदी ‘धमाका‘च केला आहे, हे आत्ता लक्षात आले. आज इथे मला मंडपाबाहेर जनसागर - जणू माणसांचा समुद्र दिसतोय. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी आले आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमाला केले संबोधित; भावनगर, गुजरात येथे 34,200 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

September 20th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भावनगर इथे 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सर्व मान्यवर आणि उपस्थित जनतेचे स्वागत केले. 17 सप्टेंबर रोजी मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा उल्लेख करत, लोकांकडून मिळालेले प्रेम हा उर्जेचा मोठा स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकर्मा जयंतीपासून गांधी जयंतीपर्यंत, म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत, देश 'सेवा पंधरवडा' साजरा करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांत गुजरातमध्ये अनेक सेवाभावी उपक्रम झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले. शेकडो ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, आतापर्यंत एक लाख व्यक्तींनी रक्तदान केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अनेक शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून, लाखो नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरात 30,000 हून अधिक आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत, तिथे सामान्य जनतेला आणि विशेषतः महिलांना वैद्यकीय तपासणी आणि उपचार पुरवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी देशभरातील सेवा उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक केले आणि आभार मानले.

वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले सर्वांचे आभार

September 17th, 08:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून आलेल्या असंख्य शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपुलकीच्या संदेशांबद्दल जनशक्तीचे आभार मानले. हा स्नेह आपल्याला बळकट करतो आणि प्रेरणा देतो असे मोदी यांनी नमूद केले.

PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes

September 17th, 03:03 pm

The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

July 10th, 09:04 am

गुरु पौर्णिमेच्या विशेष पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉक्टर्स डे निमित्त पंतप्रधानांच्या डॉक्टरांना शुभेच्छा.

July 01st, 09:37 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. आपल्या डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्य आणि परिश्रमाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यातील करुणेची भावनाही तितकीच उल्लेखनीय आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

सिक्कीम राज्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

May 16th, 10:13 am

सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ''या वर्षी हा दिवस अधिक खास आहे, कारण सिक्कीम राज्य स्थापनेचा हा 50 वा वर्धापनदिन आहे ! सिक्कीम हे शांत सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मेहनती लोकांचे राज्य आहे.