पंतप्रधानांनी हैदराबादमधील विंग्स इंडिया 2026 कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना केलेले भाषण
January 28th, 06:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राम मोहन नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, जगभरातून आलेले माननीय मंत्री, जागतिक हवाई वाहतूक उद्योगातील नेते, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर प्रतिनिधी, महिला आणि सज्जनांनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथे 'विंग्स इंडिया 2026' कार्यक्रमाला केले संबोधित
January 28th, 05:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील हैदराबाद येथे 'विंग्ज इंडिया 2026' कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उद्योगपती, तज्ञ आणि गुंतवणूकदारांचे स्वागत केले आणि हवाई वाहतूक उद्योगाचा आगामी काळ महत्त्वाकांक्षेने भरलेला असून भारत एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे नमूद केले. त्यांनी विमान निर्मिती, वैमानिक प्रशिक्षण, प्रगत हवाई वाहतूक आणि विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या क्षेत्रात भारतामध्ये असलेल्या प्रचंड संधींवर प्रकाश टाकला आणि सर्व संबंधितांसाठी 'विंग्ज इंडिया' शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.