PM to visit Uttarakhand and UP on 14 April

April 13th, 04:11 pm

PM Modi will visit Uttarakhand and Uttar Pradesh on 14 April 2026. He will travel to Saharanpur in Uttar Pradesh to review the wildlife corridor on the elevated section of the Delhi-Dehradun Economic Corridor. During the visit, he will also perform Darshan and Pooja at the Jai Maa Daat Kali Temple and inaugurate the corridor in Dehradun. The ₹12,000 crore, 213-km-long, six-lane access-controlled corridor will play a pivotal role in strengthening regional economic growth.

The strong foundation of Viksit Rajasthan is giving more strength to the resolution of Viksit Bharat: PM Modi

March 07th, 03:15 pm

PM Modi addressed the foundation stone-laying ceremony of the Kota Airport, calling it a day of new hope for Kota. He remarked that enhanced air connectivity would bring global tourists to the region, benefiting people. Listing the major infrastructure progress around the Kota region, he lauded Kota MP and Lok Sabha Speaker Om Birla for his dedication to the region’s development and his role in Parliament.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोटा विमानतळाची पायाभरणी, या प्रकल्पामुळे हाडोती क्षेत्राचा होणारा कायापालट पंतप्रधानांनी केला अधोरेखित

March 07th, 02:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित केले. हा प्रकल्प हाडोती प्रदेशाच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. राजस्थान अभूतपूर्व वेगाने प्रगती करत असून, हे नवीन विमानतळ इथल्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा कारक घटक ठरेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधानांनी वन्यजीव संवर्धनाप्रती वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार; संस्कृत सुभाषित केले सामायिक

March 03rd, 08:56 am

जागतिक वन्यजीव दिन आपल्या पृथ्वीला समृद्ध करणाऱ्या आणि परिसंस्थांना आधार देणाऱ्या अनमोल प्राणिजातीय वैविध्याचा उत्सव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वन्यजीव रक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे.वन्यजीवन समृद्धपणे नांदत राहावे यासाठी, संवर्धन, शाश्वत पद्धती आणि अधिवासांचे संरक्षण करण्याबाबत आपल्या वचनबद्धतेची आम्ही पुष्टी करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17-18 जानेवारी रोजी आसामचा दौरा

January 16th, 02:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17-18 जानेवारी 2026 रोजी आसामला भेट देणार आहेत.

आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्व वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा

December 04th, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते आणि वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, “चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.”

प्राण्यांचे संरक्षण करण्यात भारत नेहमीच आघाडीवर राहील: पंतप्रधान

March 09th, 12:10 pm

भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू, असे मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदींचा वनतारा येथील एक दिवस: आशा बाळगून वन्यजीवांवर उपचार

March 05th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी गुजरातमधील जामनगर येथे वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. रिलायन्स जामनगर रिफायनरीच्या परिसरात 3,500 एकरांवर उभारण्यात आलेले वनतारा हे जगातील सर्वात मोठे वन्यजीव केंद्र असून ते 2,000 हून अधिक प्रजातींच्या 1.5 लाखांहून अधिक संकटातून सोडवण्यात आलेल्या, धोक्यात असलेल्या आणि जीव गमावण्याची भीती असलेल्या प्राण्यांना मुक्तपणे वावरण्याचे आश्रयस्थान आहे. वनतारा हे केवळ आश्रयस्थान नाही तर प्राण्यांच्या नैतिक हिताचे आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या भारताच्या वाढत्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.

वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन,सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

March 04th, 04:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जामनगर इथे वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले.अनंत अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या करुणापूर्ण प्रयत्नांबद्दल प्रशंसा करुन ते म्हणाले की,वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित आसऱ्याचे ठिकाण आहे. पर्यावरणाची शाश्वतता व वन्यजीवांच्या कल्याणालाही इथे प्रोत्साहन दिले जात आहे.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी देशाची बांधिलकी पंतप्रधानांकडून अधोरेखित

March 03rd, 07:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त विविध वन्यजीवांच्या संरक्षणासाठी असलेली देशाची बांधिलकी अधोरेखित केली. MyGovIndia च्या एक्स वरील पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणाले:

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च रोजी गीर इथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7 वी बैठक संपन्न

March 03rd, 04:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गुजरातमधील गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठकही झाली.

वन्यजीव संवर्धन प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

March 03rd, 12:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वन्यजीव संवर्धनासाठी देशाच्या समर्पित प्रयत्नांचे हार्दिक अभिनंदन केले. गेल्या दशकभरात, वाघ, बिबट्या आणि गेंड्यांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ देशाची समृद्ध जैवविविधता जपण्यातील दृढ बांधिलकी दर्शवते.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला पुनरुच्चार

March 03rd, 08:37 am

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पुनरुच्चार केला

जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 09th, 11:00 am

राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन

December 09th, 10:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.

गीर आणि आशियाई सिंह या विषयावर परिमल नाथवानी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा पंतप्रधानांतर्फे स्वीकार

July 31st, 08:10 pm

राज्यसभा सदस्य परिमल नाथवानी यांच्या गीर आणि आशियाई सिंह या विषयावर आधारित “कॉल ऑफ द गीर” हे कॉफी टेबल बुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्यात आले.

भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

February 29th, 09:35 pm

भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, बिबट्यांच्या संख्येत झालेली ही लक्षणीय वाढ म्हणजे जैवविविधतेप्रती भारताच्या अढळ समर्पणभावाचा पुरावा आहे.

पंतप्रधानांनी वन्य जीवांविषयीच्या नागरिकांच्या ट्विटला दिला प्रतिसाद

April 10th, 09:33 am

बांदीपूर व्याघ्रप्रकल्पाला पंतप्रधानांनी काल दिलेल्या भेटीदरम्यान तिथल्या हत्तीने दिलेल्या आशीर्वादाबाबत परशुराम एम जी या नागरिकाने केलेल्या ट्विट ला पंतप्रधानांनी उत्तर दिले, “ हो, हा प्रसंग माझ्यासाठी फारच वैशिष्ट्यपूर्ण होता.”

सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 03rd, 03:50 pm

काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन

April 03rd, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.