जगातील पाणथळ जागांसाठी मान्यताप्राप्त 31 शहरांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर आणि उदयपूरचे केले अभिनंदन

January 25th, 05:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील पाणथळ जागांसाठी मान्यताप्राप्त 31 शहरांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल इंदूर आणि उदयपूरचे अभिनंदन केले. ही मान्यता शाश्वत विकास, निसर्ग आणि शहरी विकास यांच्यातील सुसंवाद जोपासण्यासाठी भारताची दृढ वचनबद्धता दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले.