केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांची तिसरी उच्चस्तरीय बैठक

August 20th, 09:37 pm

भारत सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांसोबत पंतप्रधानांनी आज त्यांच्या 7, लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी, एक उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. पायाभूत सुविधा आणि संपर्क/दळणवळण व्यवस्था, सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार तसेच प्रशासन अशी मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांशी चर्चा करत, पंतप्रधानांनी या विभागांच्या भविष्यातील अजेड्यांवर चर्चा केली.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा

August 06th, 06:55 pm

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

PM chairs CCS Meeting to review the situation in context of ongoing West Asia Conflict

July 30th, 07:38 pm

Prime Minister Shri Narendra Modi today chaired a meeting of the Cabinet Committee on Security (CSS) to review the situation in the context of ongoing West Asia conflict and measures taken by various Ministries and Departments. This was the 4th special CCS meeting on the issue.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

July 20th, 10:30 am

मान्सून आता आपला सकारात्मक प्रभाव दर्शवू लागत असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन देखील सुरु होत आहे. मान्सून असो किंवा संसदेचे पावसाळी अधिवेशन जर दोन्ही गोष्टी सक्रिय असतील तर त्या अतिशय फलदायी ठरतात.आणि जेव्हा दोन्ही गोष्टी फलदायी असतात तेव्हा त्यातून राष्ट्राच्या हितासाठी आणि सर्व सजीव सृष्टीसाठी अमूल्य योगदान मिळते. या आशेसह हा मान्सून असाच सक्रिय राहो आणि पावसाळी अधिवेशन फलदायी ठरो, अशी आपण प्रार्थना करुया.

PM Modi's statement at the start of the Monsoon Session of 2026

July 20th, 10:00 am

Addressing the media ahead of the Monsoon Session of Parliament, PM Modi highlighted the remarkable milestones the country has achieved over the past month across sectors such as space, energy, semiconductors and railways. He noted that India recorded a growth rate of 7.7%, remaining the fastest-growing major economy in the world. He also emphasised the importance of Parliament functioning smoothly and holding meaningful discussions to take the country forward.

भारत-न्यूझीलंड संयुक्त निवेदन

July 11th, 07:59 am

न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 जुलै 2026 रोजी ऑकलंड, न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. गेल्या 40 वर्षांतला भारतीय पंतप्रधानाचा न्यूझीलंडचा हा पहिलाच दौरा असून, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री व भागीदारीला एक नवीन दिशा देणारा आहे.

New India's resolve helped overcome the 21st century's biggest energy crisis: PM Modi in Balotra, Rajasthan

July 04th, 12:50 pm

Addressing a public gathering in Balotra, Rajasthan, PM Modi highlighted Rajasthan's development journey, including the dedication of the Rajasthan Refinery, expansion of connectivity, water projects, renewable energy and employment initiatives. He also spoke about India's efforts to ensure energy security during the global crisis and reaffirmed the government's commitment to a self-reliant India.

राजस्थानातील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी

July 04th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी, या विकास प्रकल्पांमध्ये सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. रणरणत्या उन्हातही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान, या अभूतपूर्व गर्दीला सध्याच्या शासनावर जनतेने लावलेली विश्वासाची मोहोर, असे म्हणाले. तुमच्या या अफाट पाठिंब्याबद्दल मी राजस्थानच्या मातीचा सदैव ऋणी राहीन. हे तुमचे प्रेम आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर असलेल्या अतूट विश्वासाची साक्ष देते, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधानांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला

June 30th, 09:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.

'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)

June 28th, 11:30 am

'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कतारच्या अमीरांसोबत दूरध्वनीवरून संभाषण

June 23rd, 10:30 pm

21 जून रोजी कतारमधील रास लाफान या औद्योगिक शहरात झालेल्या अपघातात, प्राण गमावलेल्या भारतीय नागरिकांबद्दल, कतारच्या अमीरांच्या मंत्रालयाने शोक व्यक्त केला आणि जखमी झालेल्यांच्या आरोग्यात शीघ्रगतीने सुधारणा व्हावी, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

June 18th, 05:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2026 रोजी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांची भेट घेतली.

फ्रान्समधील इव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत "सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे" या विषयावरील सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित

June 18th, 05:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील इव्हियन येथे G7 (जी-7) शिखर परिषदेत सर्वांसाठी संतुलित, सामायिक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देणे या विषयावरील सत्राला संबोधित केले.

India’s growth story is a story of inclusion, scale and democratic empowerment for all humanity: PM Modi at G7 Summit Outreach Session

June 17th, 06:07 pm

During the G7 Summit outreach session in Evian, France, PM Modi highlighted India's progress over the past 12 years under the principle of “Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayas”. He proposed combining the capital of the G7, India’s talent and the ownership of Global South countries to create the International Mobilisation Partnership for Accelerating Connectivity and Trade (IMPACT), with the objective of building corridors that connect trade, technology, energy and opportunity.

एव्हीयन येथे सुरु असलेल्या जी7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधानांची जर्मनीचे चॅन्सेलर यांच्यासोबत बैठक

June 17th, 05:34 pm

फ्रान्समध्ये एव्हीयन येथे सुरु असलेल्या जी7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. या दोन नेत्यांची या वर्षभरात झालेली ही दुसरी भेट आहे.

जी-7 शिखर परिषदे निमित्त पंतप्रधानांनी घेतली संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची भेट

June 17th, 12:38 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील एव्हियन इथे आयोजित, जी-7 शिखर परिषदेदरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. 2026 या वर्षभरातील, उभय नेत्यांची ही तिसरी भेट होती. ही भेट भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील दृढ आणि गतिमान 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चं प्रतीक आहे.

जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांशी भेट

June 17th, 12:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ्रान्स मधील एवियान शहरात सुरु असलेल्या जी-7 परिषदेच्या निमित्ताने, आज ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.

पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यामध्‍ये झालेल्या सहमतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्वागत

June 15th, 01:21 pm

पश्चिम आशियातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यामध्‍ये झालेल्या सहमतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कुवेतचे अमीर यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

June 09th, 03:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर, महामहिम शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

May 23rd, 04:20 pm

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.