भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

January 14th, 10:45 am

केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सोबती डॉ. जितेंद्र सिंह जी, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिव प्रोफेसर सेलेस्ते साउलो जी, परदेशातून आलेले आपले विशेष अतिथी गण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन जी, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा जी, इतर महानुभाव, सर्व वैज्ञानिक आणि विविध विभाग तसेच संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित

January 14th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.

भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात पंतप्रधान सहभागी होणार

January 13th, 11:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे भारतीय हवामान विभागाच्या 15व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होतील. ते तिथे उपस्थितांना संबोधित देखील करतील.

कारगिल विजय दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील द्रास येथे केलेले भाषण

July 26th, 09:30 am

लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा, केंद्रीय मंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दल प्रमुख, कारगिल युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख पदावर असलेले जनरल व्ही पी मलिक, माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, सेवेमधील आणि सेवानिवृत्त शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिक, कारगिल युद्धातील वीर योद्ध्यांच्या माता, वीर नारी आणि त्यांचे कुटुंबीय,

कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधानांनी लडाख येथे आयोजित श्रद्धांजली समारंभात भाग घेतला

July 26th, 09:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आभासी पद्धतीने लडाख येथील शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभी सुरुंगस्फोट पाहिला. शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पादुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा दुहेरी -ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे लेह भागाशी वर्षभरात कोणत्याही मोसमात संपर्क करण्याची कायमची सोय होणार आहे.

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन

February 14th, 10:39 am

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.