विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 च्या समारोपातील पंतप्रधानांचे संबोधन
January 12th, 06:45 pm
जेव्हा 2047मध्ये आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील, त्या टप्प्याकडे जाणारा प्रवास भारतासाठी महत्त्वाचा आहे, आणि तोच कालावधी तुमच्याही आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ असेल, म्हणजेच तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुमची ताकद भारताचे ताकद होईल, तुमचे यश, भारताच्या यशाला नव्या शिखरावर घेऊन जाईल. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. या विषयावर मी पुढे सविस्तर चर्चा करेन, पण पहिल्यांदा आजच्या विशेष दिवसाविषयी बोलू या.Prime Minister Shri Narendra Modi addresses the Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026
January 12th, 06:30 pm
In his address at the concluding session of the Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026, PM Modi underscored the critical role of youth leadership in realising the vision of a developed India. He highlighted key reforms and initiatives such as Startup India, Digital India, Ease of Doing Business, and the simplification of tax and compliance, which accelerated India’s startup revolution. The PM encouraged the youth to move forward with confidence, expressing unwavering faith in their potential.एबीपी नेटवर्क इंडिया @2047 शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 06th, 08:04 pm
भारत मंडपमचा हा मंच आज सकाळपासून एक सजीव व्यासपीठ बनला आहे. नुकतीच मला तुमच्या पथकाची काही मिनिटांसाठी भेट घेण्याची संधी मिळाली. ही शिखर परिषद बऱ्याच विविधतेने नटलेली आहे. अनेक माननीय व्यक्तींनी या शिखर परिषदेत रंग भरले आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाही खूप छान अनुभव आला असेल. या परिषदेत मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांच्या असलेल्या उपस्थितीत बहुदा त्याचे अनोखेपण सामावले आहे. विशेषतः आमच्या ड्रोन दीदी आणि लखपती दीदींनी त्यांचे अनुभव सामायिक केले. जेव्हा मी नुकताच या सर्व निवेदकांना भेटलो तेव्हा मी पहात होतो की ते त्यांचे अनुभव अत्यंत उत्साहाने सामायिक करित आहेत. त्यांचा प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात होता. याचा अर्थ असा की ही एक खूपच प्रेरणादायी संधी साध्य झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनाला केले संबोधित
May 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत मंडपममधील या कार्यक्रमात सकाळपासूनच उत्साहाचा संचार आहे. त्यांनी आयोजकांच्या चमूसोबतच्या संवादाचा उल्लेख केला आणि शिखर संमेलनातील समृद्ध विविधता अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या गतिशीलतेमध्ये योगदान दिलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहभागाची त्यांनी दखल घेतली. सर्व उपस्थितांना अत्यंत सकारात्मक अनुभव आला असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. शिखर संमेलनात युवा वर्ग आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती अधोरेखित करताना, त्यांनी विशेषतः ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी अनुभवांकडे लक्ष वेधले. त्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले.मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
May 01st, 03:35 pm
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेव्हज 2025 चे उद्घाटन
May 01st, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी आज साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व आंतरराष्ट्रीय मान्यवर, राजदूत आणि सृजनशील उद्योगातील अग्रणींच्या उपस्थितीचे कौतुक करत, पंतप्रधानांनी या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. 100 हून अधिक देशांचे कलाकार, नवोन्मेषक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, प्रतिभा आणि सृजनशीलतेच्या जागतिक परिसंस्थेचा पाया रचण्यासाठी एकत्र आले आहेत यावर त्यांनी भर दिला. वेव्हज ही केवळ एक संक्षिप्त संज्ञा नव्हे तर संस्कृती, सृजनशीलता आणि सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीचे प्रतिनिधित्व करणारी एक लाट आहे, असे त्यांनी नमूद केले. ही शिखर परिषद चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन आणि कथाकथनाच्या विस्तृत जगाचे प्रदर्शन करते, तसेच कलाकार आणि सर्जकांचा संवाद साधून त्यांच्या सहयोगासाठी एक जागतिक मंच प्रदान करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पंतप्रधानांनी या ऐतिहासिक प्रसंगी सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि देश-विदेशातील मान्यवर अतिथींचे हार्दिक स्वागत केले.पंतप्रधान 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशला देणार भेट
April 30th, 03:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना भेट देतील. पंतप्रधान 1 मे रोजी मुंबईला भेट देतील आणि सकाळी 10:30 वाजता त्यांच्या हस्ते जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन करण्यात येणार आहे.रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 26th, 11:23 am
आज 51000 हून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पक्क्या सरकारी नोकरीची पत्रे देण्यात आली आहेत. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तरुणांच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली आहे. तुमची जबाबदारी देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याची आहे, तुमची जबाबदारी देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याची आहे, देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही तुमची जबाबदारी आहे, कामगारांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमची कामे जेवढ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल तेवढा त्याचा सकारात्मक परिणाम विकसित भारताच्या प्रवासावर पडलेला दिसेल. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
April 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले; याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नवनियुक्त 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्यात आले. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे, असे पंतप्रधानांनी आजच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना सांगितले. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्यक कर्तव्ये पार पाडण्याचे काम या तरुणांना करावयाचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित कले. नव्याने कामावर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पण भावाने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण
April 08th, 08:30 pm
या शिखर परिषदेद्वारे तुम्ही मला देश आणि जगभरातील आदरणीय पाहुण्यांशी तसेच तुमच्या प्रेक्षकांशी जोडण्याची संधी दिल्याबद्दल मी नेटवर्क 18 चे आभार मानतो. तुम्ही या वर्षीच्या शिखर परिषदेला भारताच्या तरुणांच्या आकांक्षांशी जोडले आहे, याचा मला आनंद आहे. या वर्षीच्या सुरुवातीला, विवेकानंद जयंतीला, विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग येथेच भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, मला तरुणांच्या डोळ्यात स्वप्नांची चमक, त्यांच्या दृढनिश्चयाची ताकद आणि भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची त्यांचा ध्यास दिसला. जर आपण 2047 पर्यंत भारताला कोणत्या उंचीवर नेण्याची आपली आकांक्षा आहे आणि आपण ज्या पथदर्शीचे अनुसरण करत आहोत त्याचा विचार जर आपण प्रत्येक पावलागणिक करत राहिलो तर 'अमृत' नक्कीच उदयास येईल. आणि हे 'अमृत' 'अमृत काल' च्या पिढीला ऊर्जा आणि दिशा तसेच भारताला गती प्रदान करेल. मी या शिखर परिषदेबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूज 18 रायझिंग भारत शिखर परिषदेला केले संबोधित
April 08th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे न्यूज18 रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि जगभरातील आदरणीय अतिथींशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी नेटवर्क18 चे आभार मानले. या वर्षीची शिखर परिषद भारताच्या युवकांच्या आकांक्षांवर केंद्रित असल्याचे त्यांनी कौतुक केले. या वर्षीच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भारत मंडपम येथे आयोजित 'विकसित भारत युवा नेता संवाद 'चे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची स्वप्ने , दृढनिश्चय आणि आवड यांचा उल्लेख केला. त्यांनी 2047 पर्यंत भारताच्या प्रगतीच्या रुपरेषेबाबतवर भर देत सांगितले की प्रत्येक टप्प्यावर निरंतर विचारमंथन केल्याने मौल्यवान विचार अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. ही माहिती अमृत काळातील पिढीला ऊर्जा देईल , मार्गदर्शन करेल आणि गतिमान करेल असे त्यांनी नमूद केले. त्यांनी शिखर परिषदेच्या यशासाठी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.PM chairs an extensive meeting of the Advisory Board of WAVES
February 07th, 11:41 pm
The Prime Minister Shri Narendra Modi chaired an extensive meeting of the Advisory Board of WAVES through Video Conference today. WAVES is a global summit that brings together the world of entertainment, creativity and culture.उत्कर्ष ओदिशा - मेक इन इंडिया कॉनक्लेव्हमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
January 28th, 11:30 am
जानेवारी महिन्यात, म्हणजे 2025 च्या सुरुवातीलाच माझा ओदिशाचा हा दुसरा दौरा आहे. काही दिवसांपूर्वी मी इथे झालेल्या अनिवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. आज आता उत्कर्ष ओदिशा कॉन्क्लेव्हमध्ये मी तुमच्या सोबत आलो आहे. मला सांगण्यात आले आहे की ओदिशामध्ये आयोजित केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी व्यवसायविषयक शिखर परिषद आहे. पूर्वीच्या तुलनेत पाच ते सहा पटीने अधिक गुंतवणूकदार यात सहभागी होत आहेत. ओदिशाच्या जनतेचे, ओदिशा सरकारचे या अप्रतिम कार्यक्रमासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वरमध्ये केले “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन
January 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे “उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा” संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओदिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओदिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओदिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओदिशाची जनता आणि ओदिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले.संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 29th, 11:30 am
मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !