New India's resolve helped overcome the 21st century's biggest energy crisis: PM Modi in Balotra, Rajasthan
July 04th, 12:50 pm
Addressing a public gathering in Balotra, Rajasthan, PM Modi highlighted Rajasthan's development journey, including the dedication of the Rajasthan Refinery, expansion of connectivity, water projects, renewable energy and employment initiatives. He also spoke about India's efforts to ensure energy security during the global crisis and reaffirmed the government's commitment to a self-reliant India.PM Modi launches multiple development projects worth around ₹1.06 lakh crore in Balotra, Rajasthan
July 04th, 12:30 pm
Addressing a public gathering in Balotra, Rajasthan, PM Modi highlighted Rajasthan's development journey, including the dedication of the Rajasthan Refinery, expansion of connectivity, water projects, renewable energy and employment initiatives. He also spoke about India's efforts to ensure energy security during the global crisis and reaffirmed the government's commitment to a self-reliant India.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 51 वी बैठक संपन्न
May 27th, 10:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सेवा तीर्थ येथे प्रगती या माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाने सक्षम, बहु पद्धतीय मंचाची 51 वी बैठक पार पडली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे प्रयत्न सुरळीतपणे एकत्र करून सक्रीय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी यांची जोपासना करणे हा या मंचाचा उद्देश आहे.बंगळुरू येथील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांच्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 10th, 11:05 am
आजची ही सकाळ एक वेगळीच अनुभूती घेऊन आली आहे. मुलांच्या वैदिक मंत्रांनी झालेले स्वागत, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जींची 70 वर्षे आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची 45 वर्षे; हे असे क्षण आहेत जे माझ्या स्मरणात कायम राहतील. या अद्भुत सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी
May 10th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक मधील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले. हा सोहळा म्हणजे मंगलमय प्रसंग असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोहळ्याच्या आजच्या दिवशी सकाळी मुलांनी गायलेले वैदिक मंत्र, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जी यांचे 70 वे वर्ष आणि आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन, अशा अनेक सुखद घडामोडींमुळे आजची सकाळ समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे क्षण सदैव आपल्या स्मरणात राहतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.Gujarat’s biggest strength is that it has kept development moving continuously for the past 25 years: PM Modi in Vav-Tharad
March 31st, 05:00 pm
PM Modi launched and dedicated multiple development projects in Vav-Tharad, Gujarat, worth nearly ₹20,000 crore. Addressing a large gathering, he highlighted initiatives across roads, railways, power, water supply, urban development, healthcare and tourism aimed at boosting connectivity, improving public services and accelerating socio-economic growth in the region while strengthening the vision of a Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वाव-थराद येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे केले भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण
March 31st, 04:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील वाव-थराद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी उत्तर गुजरातसाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले; तसेच काही प्रकल्पांचे भूमिपूजन केले. नवरात्रीचा पवित्र उत्सव नुकताच साजरा झाला असून, आज 'भगवान महावीर जयंती' देखील आहे, याची नोंद घेत पंतप्रधानांनी 'माँ अंबाजी' आणि 'भगवान श्री धरणीधरजी' यांना आदरांजली अर्पण केली.पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.पंतप्रधानांकडून जागतिक जल दिनानिमित्त जलसंधारणाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार
March 22nd, 09:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन करण्याची आणि या मौल्यवान संसाधनाचा जबाबदारीने वापर करण्याची आपली बांधिलकी पुन्हा दृढ करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.केंद्रीय मंत्रीमंडळाची जल जीवन मिशनला (जेजेएम) डिसेंबर 2028 पर्यंत अतिरिक्त खर्चासह मुदतवाढ तसेच जेजेएम 2.0 अंतर्गत ग्रामीण पेयजल पुरवठा क्षेत्रामधील रचनात्मक सुधारणांवर भर देणाऱ्या पुनर्रचित अंमलबजावणीला मान्यता
March 10th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने आज जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीची पुनर्रचना तसेच सेवा वितरणाच्या दिशेने वळवण्यास मंजूरी दिली. पेयजल प्रशासन व संस्थाप्रणालीच्या पाठिंब्याद्वारे नळाद्वारे शाश्वत ग्रामीण पेयजल पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती ते पुरवठा असे हे अभियान आहे.अजमेर येथून विकासकामांचे उद्घाटन व देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 28th, 12:00 pm
तीर्थक्षेत्र पुष्कर आणि सावित्री मातेच्या या पवित्र भूमीवर, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहाण्याची, आपले आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली आहे. या व्यासपीठावरून मी सुरसुराच्या तेजा धामला, पृथ्वीराजची भूमी अजमेरला नमस्कार करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथे राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रारंभ तसेच 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन
February 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजमेर येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. राजस्थानच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पंतप्रधानांनी या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारशाबद्दल गौरवोद्गार काढले, ज्यामध्ये सुरसुराचे तेजाजी धाम आणि मेजर दलपत सिंग ज्यांनी हैफा मुक्त करण्यात बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेचे अजूनही इस्रायलमध्ये आदराणे स्मरण केले जाते, त्यांच्या शौर्याचा समावेश आहे.India - Israel Joint Statement
February 26th, 07:44 pm
At the invitation of Israeli PM Benjamin Netanyahu, PM Modi paid a state visit to Israel from 25 to 26 February 2026. The two leaders noted the immense progress made in the India-Israel bilateral relationship across perse domains. They agreed to elevate the Strategic Partnership to a new level – ‘A Special Strategic Partnership for Peace, Innovation & Prosperity.’इस्रायल दौऱ्यासाठी प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
February 25th, 08:28 am
माझे प्रिय मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निमंत्रणावरून, मी 25-26 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलला शासकीय भेट देणार आहे.पहिल्या मतदानापासून ते स्टार्टअप इंडियापर्यंत, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केली भारतातील तरुणांचे कौतुक
January 25th, 11:30 am
राष्ट्रीय मतदार दिनी प्रसारित झालेल्या या वर्षीच्या पहिल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. त्यांनी स्टार्टअप्स, जलसंवर्धन, गुणवत्ता, संस्कृती आणि उत्सव आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख विषयांवरही प्रकाश टाकला. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील तज्ञ सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.नवी दिल्ली येथे पोंगल सणानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 14th, 11:00 am
आज, पोंगल हा एक जागतिक सण झाला आहे. जगभरातील तमिळ समुदाय आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणारे लोक तो उत्साहाने साजरा करतात आणि त्यापैकी मीदेखील एक आहे. हा विशेष सण तुम्हा सर्वांसोबत साजरा करणे, माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्याकडे तमिळ जीवनात पोंगल हा एक आनंददायी अनुभव आहे. हा सण आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रती, पृथ्वी आणि सूर्याप्रती कृतज्ञतेचे प्रतीक आहे.त्याचसोबत हा सण आपल्याला निसर्ग, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन साधण्याचा मार्गदेखील दर्शवतो. देशाच्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांचा देखील उत्साह आहे. मी भारतातील आणि जगभरातील माझ्या सर्व तमिळ बंधू आणि भगिनींना पोंगल आणि सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे पोंगल सोहळ्याला केले संबोधित
January 14th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पोंगल सोहळ्याला संबोधित केले. तमिळ भाषेत शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, “आज पोंगल हा एक जागतिक सण बनला आहे”, जो जगभरातील तमिळ समुदायांद्वारे आणि तमिळ संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकांद्वारे उत्साहाने साजरा केला जातो, आणि आपण देखील त्यापैकीच एक आहेत. हा विशेष सण सर्वांसोबत साजरा करणे हे आपले भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. तमिळ जीवनात पोंगल हा एक सुखद अनुभव आहे, जो शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल, पृथ्वीबद्दल आणि सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच निसर्ग, कुटुंब आणि समाजात संतुलन राखण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या काळात देशाच्या विविध भागांमध्ये लोहरी, मकर संक्रांती, माघ बिहू आणि इतर सणांच्या उत्साहात लोक रमले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारतातील आणि जगभरातील सर्व तमिळ बंधू-भगिनींना पोंगलच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच इतर सर्व सणांसाठी शुभेच्छा दिल्या.Yuva Shakti is driving developed India while strengthening cultural roots: PM at release of 500th Book of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj
January 11th, 01:00 pm
Delivering his remarks during the release of Shrimad Vijayaratna Sunder Surishwarji Maharaj’s 500th book, PM Modi expressed confidence that this creation would benefit society, youth and humanity at large. He remarked that Maharaj’s 500 works are like a vast ocean containing countless gems of thought, offering simple and spiritual solutions to humanity’s problems. The PM also recalled the nine appeals and nine resolutions he had made for the welfare of the society.