'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
December 28th, 11:30 am
2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum
December 05th, 03:45 pm
In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी मुंबईला भेट देणार
October 27th, 10:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईला भेट देतील आणि सायंकाळी 4:00 च्या सुमारास ते नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला, संबोधित करतील तसेच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपद भूषवतील.मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 वर्षपूर्तीप्रसंगी पंतप्रधानांचे अभिवादन
September 25th, 01:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताच्या आर्थिक प्रवासावर आणि उद्योजकीय परिसंस्थेवर झालेल्या परिवर्तनात्मक परिणामाचा गौरव केला. पंतप्रधानांनी नमूद केले की, मेक इन इंडियाने भारतातील उद्योजकांना प्रचंड बळ दिले असून, त्यातून जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण झाला आहे.पंतप्रधानांनी श्री नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीचे केले स्मरण
September 07th, 04:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दूरदृष्टीचे आणि आपल्या सामाजिक तसेच आध्यात्मिक परिप्रेक्ष्यावर पडलेल्या त्याच्या प्रभावाचे स्मरण केले. त्यांची समानता, करूणा आणि विश्वबंधुत्वाची शिकवण व्यापकतेने प्रतिध्वनित होत आहे. असे मोदी यांनी म्हटले आहे.आगामी दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन: विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी आठ दिशानिर्देश
August 29th, 07:11 pm
भारत आणि जपान; मुक्त, खुला, शांत, समृद्ध आणि दडपशाहीमुक्त हिंद-प्रशांत प्रदेशाचा कायद्याच्या नियमांवर आधारित समान दृष्टिकोन असलेले दोन देश, पूरक संसाधन देणग्या, तांत्रिक क्षमता आणि किफायतशीर स्पर्धात्मकता असलेल्या दोन अर्थव्यवस्था तसेच मैत्री आणि परस्पर सद्भावनेची दीर्घ परंपरा असलेली दोन राष्ट्रे म्हणून पुढील दशकात आपल्या देशांमध्ये आणि जगात मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी एकत्रितपणे वहन करण्याचा, आपली संबंधित देशांतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याचा तसेच आपल्या देशांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्याचा आपला हेतू याद्वारे व्यक्त करीत आहेत.पंतप्रधानांनी कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात केलेले भाषण
August 06th, 07:00 pm
केंद्रिय मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, इथे उपस्थित असलेले संसद सदस्य, सरकारी कर्मचारी, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केले संबोधित
August 06th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवन-3 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. क्रांतीचा महिना असलेल्या या ऑगस्ट महिन्यात, 15 ऑगस्टच्या आधी आणखी एक ऐतिहासिक घटना जोडली गेली असल्याचे ते म्हणाले. भारत आधुनिक भारताच्या निर्मितीशी संबंधित एकामागोमाग एक महत्त्वाचे यश पाहतो आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. नवी दिल्लीतील कर्तव्य पथ, नवीन संसद भवन, संरक्षण कार्यालयाचे नवीन संकुल, भारत मंडपम, यशोभूमी, शहीदांना समर्पित राष्ट्रीय युद्ध स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, आणि आता कर्तव्य भवन अशा अलीकडील महत्वाच्या पायाभूत सुविधांचा त्यांनी उल्लेख केला. या केवळ नवीन इमारती किंवा नेहमीच्या पायाभूत सुविधा नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. अमृत काळात, विकसित भारताला आकार देणारी धोरणे याच वास्तुंमध्ये आखली जातील आणि येणाऱ्या दशकात देशाची वाटचाल या संस्थांमधूनच निश्चित होईल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी कर्तव्य भवनाच्या उद्घाटनाबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि या वास्तूच्या उभारणीत सहभागी असलेल्या अभियंत्यांचे आणि श्रमजीवींचे आभारही मानले.युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
July 24th, 04:20 pm
सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
July 24th, 04:00 pm
आपण मनापासून केलेल्या स्वागतासाठी आणि भव्य सत्कारासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आज आपण चेकर्समध्ये इतिहास घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहोत. भारत आणि ग्रेट ब्रिटन मिळून नव्या अध्यायाची सुरुवात करीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांची घेतली भेट
July 24th, 03:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 आणि 24 जुलै 2025 या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या आपल्या अधिकृत भेटीदरम्यान, आज युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची भेट घेतली. बकिंगहॅमशायरमधील चेकर्स येथील युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान स्टार्मर यांनी मोदी यांचे हार्दिक स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली तसेच शिष्टमंडळ स्तरावरील चर्चाही झाली.नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्रामध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
June 02nd, 05:34 pm
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेत आपणा सर्व अतिथींचे मी भारतात स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो. 4 दशकानंतर हा कार्यक्रम भारतात होत आहे. या 4 दशकात भारतात मोठे परिवर्तन झाले आहे. आजचा भारत पूर्वीपेक्षा अनेक पटीने आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. जागतिक हवाई परिसंस्थेत आम्ही केवळ एक मोठी बाजारपेठ नव्हे तर धोरण नेतृत्व, नवोन्मेश आणि समावेशक विकासाचे प्रतीकही आहोत. जागतिक अंतराळ-हवाई वाहतूक या एकत्रित क्षेत्रात भारत आज उगवते नेतृत्व आहे. गेल्या एका दशकातली भारताची नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातली झेप सर्व परिचित आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या 81व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या पूर्ण सत्राला केले संबोधित
June 02nd, 05:00 pm
जागतिक दर्जाची हवाई पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या आणि संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक परिषदेच्या (WATS) पूर्ण सत्राला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि चार दशकांनंतर हा कार्यक्रम भारतात होत असल्याचे महत्त्व अधोरेखित केले. या काळात भारतामध्ये झालेल्या परिवर्तनीय बदलांवर त्यांनी भर दिला, आणि आजचा भारत पूर्वीपेक्षा अधिक जास्त आत्मविश्वासाने युक्त असल्याचे नमूद केले.भारत केवळ एक मोठी बाजारपेठ नसून, धोरणात्मक नेतृत्व, नवनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी हवाई वाहतुकीच्या जागतिक परिसंस्थेत भारताच्या भूमिकेला अधोरेखित केले. आज भारत अवकाश-विमान वाहतुकीच्या एकत्रिकरणामध्ये जागतिक नेता म्हणून उदयास येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे, जे सर्वांनाच ज्ञात असल्याचेही त्यांनी सांगितले.The World This Week on India
April 22nd, 12:27 pm
From diplomatic phone calls to groundbreaking scientific discoveries, India’s presence on the global stage this week was marked by collaboration, innovation, and cultural pride.मॉरीशसच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
March 10th, 06:18 pm
माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगोलम यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत मी मॉरीशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना होत आहे.पंतप्रधान 5 मार्च रोजी रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार
March 04th, 05:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 मार्च 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. नागरिकांमधील गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष अशा महत्वाच्या विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 23rd, 06:11 pm
भैया हरौ बोलो मतंगेश्वर भगवान की जै, बागेश्वर धाम की जै, जय जटाशंकर धाम की जै, अपुन ओंरण खाँ मोरी तरफ सें दोई हाँथ, जोर के राम-राम जू।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची केली पायाभरणी
February 23rd, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी झाली. अगदी काही दिवसातच बुंदेलखंडमध्ये दुसऱ्यांदा उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आध्यात्मिक केंद्र असलेले बागेश्वर धाम आता आरोग्य केंद्र देखील होणार आहे. त्यांनी सांगितले की, 10 एकर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेमध्ये पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय उभारले जाईल.भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
January 14th, 10:45 am
केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सोबती डॉ. जितेंद्र सिंह जी, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिव प्रोफेसर सेलेस्ते साउलो जी, परदेशातून आलेले आपले विशेष अतिथी गण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन जी, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा जी, इतर महानुभाव, सर्व वैज्ञानिक आणि विविध विभाग तसेच संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो.