ओडिशातील झारसुगुडा येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

September 27th, 11:45 am

येथे काही तरुण बांधव अनेक कलाकृती घेऊन आलेले आहेत. ओडिशातील कला प्रेम जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. आपण दिलेली ही भेट मी आदरपूर्वक स्वीकारतो. माझे एसपीजी सहकारी या सर्व कलाकृती आपल्याकडून गोळा करतील. जर तुम्ही मागे तुमचे नाव व पत्ता लिहून दिलात, तर माझ्याकडून तुम्हाला पत्र अवश्य मिळेल. मागे एक लहान मूलही कलाकृती घेऊन उभे आहे, त्याचे हात दुखत असतील, कृपया त्याचीही मदत करा आणि वस्तू गोळा करून घ्या. मी या स्नेहपूर्ण भेटीसाठी आणि या कलाकृती भेट देणाऱ्या सर्व युवक-युवती व बालकांचे मनःपूर्वक आभार मानतो.

ओदिशात झारसुगुडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 60,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

September 27th, 11:30 am

सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओदिशातील जनतेने त्यावेळी विकसित ओदिशा या ध्येयाने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला होता. आज केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ओदिशा वेगाने प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले. पंतप्रधानांनी ओदिशा तसेच देशाच्या विकासासाठी हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांची सुरुवात झाल्याची घोषणा केली. या प्रसंगी त्यांनी बीएसएनएलच्या स्वदेशी 4G सेवांचा शुभारंभ करत बीएसएनएलचा नवा अवतार जनतेसमोर सादर केला. याशिवाय, देशभरातील आयआयटी संस्थांच्या विस्तारालाही आज औपचारिक सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशामध्ये शिक्षण, कौशल्य विकास आणि संपर्क सुविधा यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. बेरहमपूर ते सुरत या मार्गावर धावणाऱ्या आधुनिक अमृत भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी जनतेसाठी मोठी सोय उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, गुजरात मधील सुरत येथून दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा पंतप्रधानांनी गौरवपूर्वक उल्लेख केला. या सर्व विकास उपक्रमांबद्दल ओदिशातील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु करताना पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले भाषण

September 26th, 11:30 am

नवरात्रीच्या या मंगलमय दिवसांमध्ये मला आज बिहारच्या स्त्रीशक्ती सोबत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मी येथे पडद्यावर बघत होतो, लाखो महिला-भगिनी दिसत आहेत. नवरात्रीच्या या पवित्र काळात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद ही आम्हां सर्वांसाठी फार मोठी ताकद आहे. मी आज तुमचे मनापासून आभार मानतो. आणि आजपासूनच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरु होत आहे. मला सांगितल्यानुसार, आतापर्यंत या योजनेत 75 लाख भगिनी सहभागी झाल्या आहेत. आत्ताच या सर्व 75 लाख भगिनींच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळी 10-10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा केला शुभारंभ

September 26th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली द्वारे बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना शुभेच्छा दिल्या. बिहारच्या महिलांच्या उत्सवात आपल्याला सहभागी होता आले, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आज मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू होत असल्याचे नमूद केले. या उपक्रमात 75 लाख महिला यापूर्वीच सहभागी झाल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी जाहीर केले की या 75 लाख महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशातील धार येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 17th, 11:20 am

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव जी, केंद्रातील माझ्या सहकारी सावित्री ठाकुर जी, देशातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व केंद्रीय मंत्री, राज्यांचे राज्यपाल, राज्यांचे मुख्यमंत्री, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि देशातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले

September 17th, 11:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील धार येथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान धार भोजशाळेची पूज्य माता, ज्ञानदेवता, वाग्देवीच्या चरणी नतमस्तक झाले. आज कौशल्य आणि निर्मितीचे दैवत, भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे, असे सांगून मोदी यांनी भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले. आपली कारागिरी आणि समर्पणातून राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान देणाऱ्या कोट्यवधी बंधू-भगिनींप्रति त्यांनी आदर व्यक्त केला.

विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा

September 17th, 10:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

August 31st, 11:30 am

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.

विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या

September 17th, 09:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.बांधकाम आणि वास्तुरचना यांच्याशी निगडित कुशल आणि मेहनती कारागीर आणि त्यांची निर्मिति करणाऱ्यांना ही त्यांनी नमन केले आहे.विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान अतुलनीय असेल असा विश्वास श्री मोदींनी व्यक्त केला.

विश्वकर्मा जयंती निमित्त पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा यांना केले अभिवादन

September 17th, 08:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले.

यशोभुमी राष्ट्राला समर्पित करताना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठीत अनुवादीत मजकूर

September 17th, 06:08 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे या भव्य वास्तुत आलेले माझे प्रिय बंधू-भगिनी, देशातील 70 होऊन जास्त शहरांतील माझे सर्व सहकारी, अन्य मान्यवर आणि माझ्या कुटुंबियांनो.

पंतप्रधानांनी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे नवी दिल्लीमध्ये केले लोकार्पण

September 17th, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यशोभूमीमध्ये एक अतिशय भव्य परिषद केंद्र, विविध प्रदर्शन दालने आणि इतर सुविधांचा अंतर्भाव आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यावर पंतप्रधानांनी गुरु शिष्य परंपरा आणि नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनाची फेरफटका मारून पाहणी केली. त्यांनी यशोभूमीच्या त्रिमितीय प्रतिकृतीची देखील पाहणी केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 या नव्या मेट्रो स्थानकापर्यंतच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले.

विश्वकर्मा जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

September 17th, 09:27 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समर्पण, प्रतिभा आणि कठोर परिश्रम घेऊन समाजात नवनवीन उपक्रम पुढे नेणाऱ्या सर्व शिल्पकारांचे आणि कारागिरांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत, पारंपारिक कला कौशल्याचे काम करणाऱ्यांसाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा करणार प्रारंभ

September 15th, 12:36 pm

विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे “पीएम विश्वकर्मा” या नवीन योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

दिव्यांग बांधवांसाठी सुगम भारत निर्माण करण्यास आमचे सरकार कार्यरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

August 15th, 05:01 pm

77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात, येत्या काही महिन्यांत, विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल. अशी घोषणा केली. ही योजना, पारंपरिक कौशल्ये असलेल्या कारागिरांसाठी, म्हणजे जे कारागीर आपली साधने आणि हातांनी काम करतात, असा मुख्यत्वे इतर मागासवर्गीय समुदायासाठी असेल. यात सुतार, सोनार, पाथरवट, धोबी, न्हावी, अशा व्यावसायिकांसाठी असेल. ही योजना या कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देईल. 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही योजना सुरू केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (93 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

September 25th, 11:00 am

माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?

पंतप्रधानांचे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयटीआयच्या कौशल्य दीक्षांत समरोहातील भाषण

September 17th, 04:54 pm

मला आज देशातील लाखो आयटीआय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. कौशल्य विकासाशी संबंधित विविध संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणविश्वातील इतर मान्यवर, स्त्री आणि पुरुष!

विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कौशल दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाद्वारे केले संबोधित

September 17th, 03:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कौशल दीक्षांत समारंभाला व्हिडीओ संदेशा द्वारे संबोधित केले. या कार्यक्रमात जवळजवळ 40 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते.

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ता कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 17th, 01:03 pm

आज भारताच्या भूमीवर चित्ते परतले आहेत आणि मी तर हे देखील म्हणेन की या चित्त्यांबरोबरच भारताची निर्सगप्रेमाची भावना संपूर्ण ताकदीनिशी जागृत झाली आहे. मी या ऐतिहासिक क्षणी सर्व देशवासियांना शुभेच्छा देत आहे.

PM addresses Women Self Help Groups Conference in Karahal, Madhya Pradesh

September 17th, 01:00 pm

PM Modi participated in Self Help Group Sammelan organised at Sheopur, Madhya Pradesh. The PM highlighted that in the last 8 years, the government has taken numerous steps to empower the Self Help Groups. “Today more than 8 crore sisters across the country are associated with this campaign. Our goal is that at least one sister from every rural family should join this campaign”, PM Modi remarked.